In The Future, Eggs, Chicken May Be Shortage : Dr. pathan Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

भविष्यात अंडी, चिकनचा तुटवडा भासण्याची शक्‍यता : डॉ. पठाण

सकाळवृत्तसेवा

आजरा ः चिकन खाल्यामुळे कोरोना होतो या अफवा व गैरसमजामुळे कोबंडी व अंड्यांची मागणी घटुन दर घसरले आहेत. यामुळे कोंबडी पालन करणे पोल्ट्रीधारकांना आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याने अंडी नष्ट करणेचे प्रकार पोल्ट्रीधारकांतून होत आहेत. या पार्श्‍वभूमिवर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी पेद्रेवाडी येथील अंकिता पोल्ट्री उद्योगाला भेट दिली. अंडी नष्ट केल्यामुळे भविष्यात अंडी व चिकनचा तुटवडा जाणवण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उद्योजकांनी उत्पादन घ्यावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. 

दरम्यान, उद्योजक उतम रेडेकर व पोल्ट्रीधारकांशी चर्चा केली. उद्योग टिकवण्यासाठी सकात्मक प्रयत्न करावा, असे आवाहन पठाण यांनी केले. ते म्हणाले, ""सध्या जागतिक स्तरावर कोरोना विषाणूची आपत्ती उद्‌भवलेली आहे. या रोगावर रामबाण असे औषध किंवा लस उपलब्ध झालेली नाही. यामुळेच स्वतःची स्वच्छता राखून विषाणूपासून दूर राहता येईल. त्याचबरोबर स्वतःची रोग प्रतिकारक शक्ती वाढवून या विषाणूचा सामना करता येईल. रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी चिकन व अंडी मुबलक प्रमाणात खाणे गरजेचे आहे.

चिकन याबाबत सुरू असलेल्या अफवांवर कोणताही विश्‍वास न ठेवता आपण या जागतिक महामारीशी सामुदायिकपणे दोन हात करायला हवेत. त्याचबरोबर अंडी नष्ट केल्यामुळे भविष्यात अंडी व चिकनचा तुटवडा जाणवण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उद्योजकांनी उत्पादन घ्यावे. उद्योग वाढविण्यासाठी सकारात्मक पातळीवर प्रयत्न करावेत.'' या वेळी आजरा पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. पी. एम. जालकर, पशुधन अधिकारी डॉ. पी. डी. ढेकळे, पशुधन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Book Festival: पुस्तक महोत्सवात ५० कोटींची उलाढाल; ३० लाखांपेक्षा जास्त पुस्तकांची विक्री, साडेबारा लाख नागरिकांनी दिली भेट

Pune Accident: 'अक्कलकोटचे मायलेक रेल्वेच्या धडकेत ठार'; पिंपरी-चिंचवडमधील घटना, अंत्यविधीसाठी गावी गेले अन्..

Maharashtra Cold Wave : पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह विदर्भात थंडीचा कडाका वाढणार, किमान तापमान ८.६ अंशांवर; हवामान विभागाचा अंदाज समोर

‘परफेक्ट लूक’चा अट्टहास; देशात सौंदर्योपचारांची झपाट्याने वाढ, वर्षभरात १२.८८ लाख प्रक्रिया

Latest Marathi News Live Update : शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभ सोहळ्याला आजपासून होणार प्रारंभ

SCROLL FOR NEXT