In Gadhinglaj goat, chicken prices double Kolhapur Marathi News
In Gadhinglaj goat, chicken prices double Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लजला बकरी, कोंबडीचे दर दुप्पट 

दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : मंगळवारी (ता.11) होणाऱ्या काळभैरी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर बकरी खरेदीसाठी आज बाजार समितीच्या आवारातील जनावराच्या बाजारात झुंबड उडाली होती. मागणीमुळे दरही दुप्पटीने वाढले. भाजी मंडईत कोबी, वांगी, टोमॅटो, पालेभाज्यांची आवक वाढली असल्याने दर उतरलेलेच आहेत. बाजार समितीच्या आवारात सकाळी आठपासूनच बकरी विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची वर्दळ वाढली होती.

साडेनऊनंतर तर समितीच्या प्रवेशद्वारात पाय ठेवायलाही जागा नव्हती. ग्रामीण भागासह लगतच्या सीमाभागातील शेतकरी मोठ्या संख्येने बकरी घेऊन बाजारात आले होते. सुमारे साडेतीनशेहून अधिक आवक नोंद झाल्याचे समितीतून सांगण्यात आले. मागणी अधिक असल्याने दरही वधारले आहेत. पाच ते पंधरा हजारापर्यंत दर होते. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हे दर दुप्पटीने वाढले होते. येथील कचेरी मार्गावरील कोंबडी बाजारातही ग्राहकांची गर्दी होती. कोंबड्यांना अधिक मागणी असल्याने दर तेजीत होते. 400 ते 1000 रुपयापर्यंत कोंबड्यांचे दर होते. 

भाजी मंडईत गेल्या महिनाभरापासून पालेभाज्यांची आवक भरपूर आहे. परिणामी, दर गडगडले आहेत. त्यामुळे काढणीचा खर्चही निघेणा झाल्याने शेतकरी घाऊक बाजारात भाजीपाला आणणे बंद केले आहे. थेट ग्राहकाला विकूनच शेतकरी माघारी फिरत आहेत. तीन ते चार रुपये पेंडी असा दर आहे. कोथंबीरीचीही हीच अवस्था आहे. वांगी, काकडी, कोबी, टोमॅटो यांचेही दर कमीच आहेत. दहा किलोचे भाव असे; दिडगा 600, हिरवी मिरची 300, ढबू 250, कारली, काकडी 200, टोमॅटो 60 रुपये. 
कांद्याची स्थानिक आवक वाढली आहे.

बहिरेवाडी (ता. आजरा) येथील श्रीपती इंचनाळकर, भैरू चौगुले, संदीप खोत, संदीप पाटील यांच्या कांद्याची आवक होती. 1300 ते 2300 रुपये क्विंटल असा भाव मिळाला. किरकोळ बाजारात 20 ते 30 रुपये किलो अशी विक्री सुरू होती. लसणाची नवी आवक सुरू झाल्याचे विक्रेते अमर नेवडे यांनी सांगितले. 12 ते 18 हजार रुपये क्विंटल असा दर होता. किलोचा 150 ते 200 रुपये असा भाव आहे. बटाटा 2000 ते 2300 रुपये क्विंटल असून 25 ते 30 रुपये किलो असा किरकोळ बाजारात दर आहे. 

द्राक्षांची आवक कायम 
फळ बाजारात सांगली जिल्ह्यातून येणाऱ्या द्राक्षांची आवक कायम आहे. आवक वाढल्याने दरही कमी झाले आहेत. 40 ते 60 रुपये किलो असा दर्जानुसार दर आहे. किनोची आवकही चांगली आहे. 60 रुपये किलो असा दर आहे. सफरचंद 100 रुपये किलो आहेत. 

थायलंडची चिंच बाजारात... 
चिंच म्हटले की आंबट-गोड चव जिभेवर रेंगाळते. तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. थायलंडची गोड चिंच बाजारात दाखल झाली आहे. 400 रुपये किलो असा या चिंचेचा दर आहे. खास आकर्षक बॉक्‍समध्ये पॅकिंग करून ही चिंच बाजारात विक्रीसाठी आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT