Gadhinglaj Received New Firefighting Systems Kolhapur Marathi News
Gadhinglaj Received New Firefighting Systems Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लजला मिळाली अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा

अजित माद्याळे

गडहिंग्लज : येथील पालिकेच्या अग्निशमन दलाकडे अत्याधुनिक वाहन दाखल झाले आहे. शीघ्र गतीने आग विझविण्यासाठी आवश्‍यक त्या सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या या वाहनावर पालिका निधी आणि आग सुरक्षा निधीतून 66 लाखांचा खर्च झाला. या वाहनाद्वारे आपत्ती व्यवस्थापन विभागाची ताकद वाढली असून, वाहनाचा वेग आणि त्याची क्षमता पाहता वेळीच घटनास्थळी पोचणे शक्‍य होणार आहे. परिणामी, आगीपासून होणारे नुकसान कमी करण्यास मदत होईल. 

येथील पालिकेने 2003 मध्ये खरेदी केलेले अग्निशमन वाहन आजपर्यंत सेवेत होते. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यात येथील पालिकेचे एकमेव अग्निशमन वाहन आहे. अनेक आगी विझवून लाखोंचे नुकसान कमी करण्यात अग्निशमन दलाचे योगदान आहे. पूर्वीचे अग्निशमन वाहन जुने असल्याने अनेकदा त्यात बिघाड व्हायचा. दुरुस्तीसाठी सेवा बंद करावी लागायची.

परिणामी, त्या कालावधीत लागलेल्या आगी विझविण्यासाठी कर्नाटकातून अग्निशमन दलाला पाचारण करावे लागायचे. यामुळे नव्या वाहनाची गरज ओळखून पालिकेने 2016 मध्ये शासनाच्या अग्निशमन सेवा संचालनालयाकडे परवानगीसाठी प्रस्ताव दिला. वेळोवेळी पाठपुरावा सुरू असला तरी मध्यंतरी निवडणुका आणि इतर तांत्रिक कारणामुळे नव्या अग्निशमन वाहनाची प्रतीक्षा लांबत गेली. 

अग्निशमन संचालनालयाने मंजुरी दिल्यावर 16 लाखांचे नवे वाहन खरेदी करण्यात आले. त्याला यंत्रणा कार्यन्वित करण्यासाठी 50 लाखांचा खर्च आला. पालिका निधीतून 25 लाख आणि उर्वरित रक्कम आग सुरक्षा निधीतून खर्च करण्यात आली. जुने वाहन तीन हजार लिटर पाणी क्षमतेचे होते. आता नवे पाच हजार लिटर क्षमतेचे असून, त्यातील 500 लिटरचे फोम टॅंक आहे. अत्याधुनिक सुविधेमुळे आपत्ती व्यवस्थापन जलदगतीने करण्यासाठी पथकाची ताकद वाढली. दरम्यान, अत्याधुनिक वाहनानुसार अग्निशमन दलासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ वाढवण्याचीही गरज आहे. नगराध्यक्षा स्वाती कोरी यांच्यासह उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नवे वाहन दाखल झाले. 

दृष्टिक्षेपात नवे अग्निशमन वाहन 
- हाय प्रेशर गन, अत्याधुनिक पाणी उपसा पंप 
- कुलिंग सिस्टिम, रिव्हर्स कॅमेरा 
- 40 फुटांपर्यंतची शिडी 
- 4500 लिटर पाणी, 500 लिटरची फोम टॅंक 
- अधिक पाणी क्षमतेमुळे एकाच फेरीत आग विझण्यास मदत 
- 500 फुटांपर्यंतचा पाईप ठेवता येऊ शकतो 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT