कोल्हापूर

गैबी घाटातून प्रवास करताय, मग थोडं जपूनच जा!

डोंगर खचल्याने प्रवासाचा धोका; घाटात आणखी भूस्खलनाचा धोका

- राजू पाटील

राशिवडे बुद्रुक : पावसाने राधानगरी तालुक्यात (radhanagari) अनेक ठिकाणी डोंगर ढासळण्याच्या (landslide) घटना घडल्या आहेत, अजूनही घडत आहेत. कोल्हापूर-राधानगरी-गोवा हा राज्य मार्ग असलेल्या गैबी घाटातून (gaibi ghat) प्रवास जिकिरीचा ठरत आहे. या घाटातील डोंगर मोठ्या प्रमाणात खचल्याने प्रवाशांना या घाटातून जाताना जपूनच जावे लागेल, हा इशारा आहे.

गेल्या आठवड्यात पाच दिवस तो कोसळतच होता. यामुळे डोंगराच्या जमिनी उघळल्या आणि त्या घसरू लागल्या. नुकसान झाले आहे. याचा फटका कोल्हापूर (kolhapur) कोकण राज्य मार्गालाही बसत आहे. खिंडी व्हरवडेपासून राधानगरीपर्यंतचा साधारणता आठ किलोमीटरचा हा घाट सध्या धोकादायक परिस्थितीत आहे. (konkan news)

ठिकठिकाणी भूस्खलन होण्याच्या मालिका सुरू झाल्या आहेत, त्या अद्यापही थांबलेल्या नाहीत. खिंडी व्हरवडेपासून गैबीपर्यंतच्या पाच किलोमीटरच्या पट्ट्यात आठ ठिकाणी डोंगर घसरला आहे. यापैकी करंजफेणच्या धबधब्यापासून ते आंब्यापर्यंतचा परिसर डोंगर रस्त्यावर आल्याच्या खुणा ठेवून आहे. इथे घसरलेला डोंगर सार्वजनिक बांधकाम विभाग दोन दिवस काढत होते. आजही हा परिसर धोकादायक स्थितीत आहे. पाऊस वाढल्यास केव्हाही इथे भूस्खलन होण्याचा धोका आहे. रात्री-अपरात्री या मार्गावरून प्रवास करताना याचे भान ठेवूनच ये-जा करावी लागेल, अशी परिस्थिती येथे आहे.

लातूरला जाणारी एसटी सरकली

आज सकाळी साडेनऊला कणकवलीवरून लातूरला जाणारी एसटी या घाटात घसरलेल्या मातीवरून सरकली आणि डाव्या बाजूला झाडावर जाऊन आदळली. चालकाचे प्रसंगावधान व सुदैवाने जीवितहानी टळली. झाडावर गाडी आदळली नसती, तर कदाचित तीनशे फूट खाली किंवा उतारावरील शेतात पलटी झाली असती आणि अनर्थ घडला असता. केवळ घसरलेल्या डोंगराच्या चिखलामुळेच हा अपघात घडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salim Wastik: 31 वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात! ‘Ex-Muslim’ युट्यूबर निघाला कुख्यात अपहरणकर्ता, वाचा थरारक inside story

Post-Meal Watermelon and Bloating: आरोग्यासाठी चांगलं असलेलं कलिंगड जेवणानंतर खाल्ल्याने पोट का फुगतं? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण

Latest Marathi News Live Update : पुण्यात भरदिवसा चोरी, महिलेचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे दुचाकीवरून पसार

Pune Crime: पुण्यात बंगल्याच्या आवारातच गांजाची लागवड; लोहगाव पोलिसांची धडक कारवाई, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त!

Journalism Awards: अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना; अभिजित करंडेंना मोहन मस्कर सन्मान, कोल्हापूरमध्ये सन्मान सोहळा..

SCROLL FOR NEXT