sakal
कोल्हापूर

पश्चिम केनियात गणपती आरतीला चंदगडी स्वरसाज

ऑनलाइन सोहळा; म्हाळेवाडी येथील सुधीर पाटील यांना आरती गायनाचा मान

सुनील कोंडुसकर

चंदगड: पश्चिम केनियातील एल्डोरेट शहरांमध्ये गणेशोत्सव उत्साहाने साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक नियम केले आहेत. दररोज ठराविक मानकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होतात. अन्य भक्त झूम अॅपवर ऑनलाईन सहभागी होतात. कार्यक्रमात दररोजची गणेशाची आरती म्हणण्याचा मान केनियास्थित म्हाळेवाडी (ता. चंदगड) सुधीर पाटील यांना मिळाला आहे. चंदगडी आवाजातील मराठी आरतीने या उत्सवाची रंगत वाढली आहे.

एल्डोरेटमधील श्रीराम मंदिरात १९३४ पासून गणेश चतुर्थीनिमित्त मूर्ती प्रतिष्ठापित करून उत्सव साजरा केला जातो. गणेशाची ही मूर्ती भारतातून मागवली जाते. अलीकडे काही स्थानिक कलाकारही मूर्ती बनवत आहेत. दरम्यान कोरोनामुळे यावर्षी गर्दीला मर्यादा आल्या आहेत. दररोज यजमान दहा कुटुंबांना सहभागी होण्याची परवानगी मिळते. तेथे अभिषेक, भजन व आरतीचे विधी झूम अॅपवरून प्रसारित केले जातात.

या कार्यक्रमात अन्य भाविक ऑनलाईन सहभागी होतात. जयकारा आणि फळ स्वरूपात प्रसाद वाटला जातो. या शहरात गुजराती नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र बहुतेकांच्या पत्नी गुजराती असल्या तरी मुंबईत लहानाच्या मोठ्या झाल्या असल्यामुळे त्यांना मराठी आरती आवडते असे सुधीर पाटील यांनी सांगितले. गावापासून शेकडो मैल दूर गणेशोत्सवाचा सण साजरा करताना, त्यातही मराठीतून आरती गायन करताना ऊर अभिमानाने भरून येतो असे त्यांनी सांगितले.

८७ वर्षांची परंपरा

केनियाची राजधानी नैरोबीमध्ये ८७ वर्षापासून गणेशोत्सव साजरा केला जातो. नोकरी-व्यवसायानिमित्ताने तेथे स्थायिक झालेले पंजाबी, शहा, ब्राह्मण, पटेल आदी लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. अलीकडे महाराष्ट्र मंडळाने पुढाकार घेतला आहे. पारंपारिक गाणी, झिम्मा, फुगडी आदींच्या माध्यमातून या उत्सवाची रंगत वाढवली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Injury Updates: मुंबई इंडियन्ससह ८ संघांना बसलाय दुखापतीचा फटका; आतापर्यंत १४ खेळाडूंनी वाढवली फ्रँचायझींची डोकेदुखी

मिरा-भाईंदरमध्ये नवे वाहनतळ उभारणार, वाहतूक कोंडी कायमची फुटणार; पालिकेचा मोठा निर्णय

जीजी झाली मॉडर्न! 'येड लागलं प्रेमाचं' मधून एक्झिट घेताच नव्या मालिकेत दिसणार नीना कुळकर्णी; नेटकरी चकीत

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवड शहरातील डी. वाय. पाटील रुग्णालयातून ५.२२ लाखांची इंजेक्शने लंपास

Sugar industry: राज्यातील साखर उद्योग सापडला आर्थिक कोंडीत; अनुदानाची टांगती तलवार, ३०० कोटींचा ‘ट्रेझरी’ प्लॅन!

SCROLL FOR NEXT