Ganeshwadi Krishna River Cemetery Mantrik Bhanamati Mantra esakal
कोल्हापूर

नदीकाठच्या स्मशानभूमीत अघोरी कृत्य; पौर्णिमेच्या रात्री अंगाला अंगारा लावून मांत्रिकासह 15 जणांनी केला विधी, करणीचा प्रकार उघड

हळद, कुंकू, लिंबू, मातीची मडकी, गुलाबाची फुले यांचा वापर करून पूजा मांडण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

युवकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून मांत्रिकासह अन्य काहीजणांना कुरुंदवाड पोलिसांच्या ताब्यात दिले.

कुरुंदवाड : गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदी (Krishna River) काठच्या स्मशानभूमीत शुक्रवारी (ता. २९) रात्री सुरू असलेल्या अघोरी कृत्याचा युवकांनी पर्दापाश केला. सबंधित प्रकार हा भानामती किंवा करणीचा असल्याचे युवकांच्या लक्षात आले.

त्यानंतर युवकांनी त्यांना रोखून कुरुंदवाड पोलिसांच्या (Kurundwad Police) स्वाधीन केले. या प्रकाराने गावात मात्र भीतीचे वातावरण पसरले होते. गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीकाठावर स्मशानभूमीत शुक्रवारी (ता. २९) पौर्णिमेच्या रात्री अंगाला अंगारा लावून एका मांत्रिकासह सांगली (Sangli) जिल्ह्यातील पंधरा जणांनी एक विधी केला.

त्यासाठी हळद, कुंकू, लिंबू, मातीची मडकी, गुलाबाची फुले यांचा वापर करून पूजा मांडण्यात आली. विविध लाकडाचा वापर करून होम हवन करण्यात आले. सुमारे अडीच-तीन तासापर्यंत हा प्रकार सुरू होता. यासाठी आलेल्या लोकांनी आपली वाहने हनुमान मंदिरजवळ लावली होती. स्मशानभूमीत सुरू असलेल्या प्रकाराबद्दल गावातील कांही युवकांना संशय आला. युवकांनी थेट स्मशानभूमीत येऊन त्याबाबत विचारणा केली.

मात्र, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने गावातील तरुणांचा संशय बळावला. अधिक चौकशी केली असता विधी केलेल्या ठिकाणी पूजा मांडून अघोरी कृत्य केल्याचे दिसून आले. हा प्रकार भानामतीचा प्रकार असल्याचा संशय आल्याने तरुणांनी त्यांच्या पिशव्या तपासल्या त्यामधे लिंबू, कुंकू हळद, दोरा गंडे, नारळ आदी साहित्य सापडले. युवकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून मांत्रिकासह अन्य काहीजणांना कुरुंदवाड पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांकडून खातरजमा

दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी पंधरा जणांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता मयत मुलाची शांती घालण्यासाठी हा विधी केल्याचे पोलिसांना सांगितले. याबाबत खातरजमा करून पोलिसांनी मांत्रिकासह सबंधितांना ताकीद देत सोडून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

T20 WC, IND W vs SA W : स्मृती-शफालीची तुफान सुरुवात, पण द. आफ्रिकेने आवळले फासे; तरीही टीम इंडिया दीडशे पार

NEET 2026 Retest: NEET पुनर्परीक्षा अवघड: भौतिकशास्त्र-रसायनशास्त्राने विद्यार्थ्यांची कसोटी, कट-ऑफ व गुणवत्ता यादीवर परिणामाची शक्यता

PM Kisan eKYC : तांत्रिक अडचणींनी पीएम किसान ई-केवायसी ठप्प; हजारो शेतकरी हप्त्यापासून वंचित होण्याची भीती

Buldhana Andura Accident: अंदुराजवळ एसटी बस-दुचाकी भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावरील भेगांमुळे नियंत्रण सुटल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT