Gargoti Mahalwadi Shengaon Devkewadi have been excluded from the restricted area 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' गावांना वगळले प्रतिबंधित क्षेत्रातून....

सकाळवृत्तसेवा

गारगोटी - आकुर्डे (ता. भुदरगड) येथे कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यानंतर आकुर्डे, गारगोटीसह परिसरातील तीन गावांचे क्षेत्र प्रांताधिकार्यांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले होते. येथील लॉकडाऊन व सर्व रस्ते बंद केल्याने उलाढाल ठप्प झाली होती. व्यापारी संघटना व पदाधिकार्यांच्या मागणी व बैठकीनंतर नियमावलींचे पालन करण्याच्या अटीवर गारगोटी, महालवाडी, शेणगांव, देवकेवाडी या गावांना प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात आले आहे.                

प्रांताधिकार्यांनी याबाबतचा सुधारित प्रतिबंधित क्षेत्र निश्चिती आदेश काढला. या आदेशामुळे गारगोटी बाजारपेठ सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. प्रांताधिकार्यांनी काढलेल्या आदेशात सर्व लहान-मोठे व्यापारी लोकांनी त्यांची दुकाने सम व विषम दिवशी सुरु ठेवावीत. गडहिंग्लज रोड ते ग्रामीण रुग्णालय गारगोटी,पाटगांव रोड ते कोल्हापूर रोड,
गारगोटी ते सोनाळी रोडवरील दोन मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या लहान रस्त्यावर असणाऱ्या  दुकानांबाबत दिशा निश्चित करण्याची जबाबदारी व्यापारी असोसिएशन यांची राहिल. आस्थापनांमधून दवाखाने, पेट्रोल पंप, स्वस्त धान्य दुकान, मेडीकल व वित्तीय संस्था वगळण्यात येत आहेत. दुकानात व दुकानाबाहेर योग्य ते सामाजिक अंतर ठेवण्याची संबंधित दुकानदारावर जबाबदारी निश्चित केली आहे.

दुकानामधील व दुकानांचे बाहेरील व्यक्तींनी चेहऱ्यावर मास्क-रुमाल वापरणे बंधनकारक असून त्याबाबत संबंधित व्यापारी आस्थापना यांच्यावर जबाबदारी निश्चित केली आहे. सार्वजनिक ठिकाणे व कामाची ठिकाणे या ठिकाणी पाळावयाची कोविड-19 व्यवस्थापनाबाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करणे सर्व नागरिकांवर व संस्थावर बंधनकारक राहील आदी अटी व शर्ती घातल्या आहेत. याचा भंग केल्यास संबंधित व्यापारी आस्थापना यांच्यावर प्रचलित तरतूदीनुसार फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याबाबतचे निर्देश भुदरगडच्या पोलीस निरीक्षकांना दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT