get back the vehicles seized during the lockdown period in ichalkaranji 
कोल्हापूर

लॉक डाऊनच्या कालावधीत जप्त केलेली वाहने इचलकरंजीकरांना परत मिळणार ?

पंडित कोंडेकर

इचलकरंजी - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूरच्या धर्तीवर लॉक डाऊनच्या कालावधीत जप्त करण्यात आलेली वाहने परत देण्याच्या हालचाली सुुरु आहेत. शहरातील तीन पोलीस ठाणे व एक वाहतूक शाखा यांनी केलेल्या कारवाईत तब्बल पाच हजार वाहने ताब्यात घेण्यात आली आहे. दंडात्मक कारवाई करुन ही वाहने देण्याबाबत पोलीस यंत्रणेकडून नियोजन सुरु आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून लॉक डाऊन घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे विनाकारण फिरणार्‍या वाहनधारकांवर पोलिस यंत्रणेने कारवाई केली होती. शहरातील गावभाग, शिवाजीनगर, शहापूर या तीन पोलीस ठाण्यांसह शहर वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात आली होती. आतापर्यंत सुमारे पाच हजार वाहने जप्त करण्यात आली आहेत. अद्यापही सकाळच्या सत्रात नाहक फिरणार्‍या दुचाकींवर कारवाईचे सत्र सुरुच आहे.
दरम्यान, कोल्हापूरात अशा प्रकारे ताब्यात घेण्यात आलेली वाहने 3 मे नंतर दंडात्मक कारवाई करुन संबंधित मालकांच्या ताब्यात दिली जाणार आहेत. याच पार्श्‍वभूमीवर इचलकरंजीतही कोल्हापूरच्या धर्तीवर वाहने दंडात्मक कारवाई करुन मालकांना परत देता येतील काय, याबाबत पोलीस यंत्रणेकडून हालचाली सुरु केल्या आहेत. वाहतूक शाखेकडून ताब्यात घेण्यात आलेली वाहने दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मात्र पोलीसांनी ज्या वाहनांवर रितसर गुन्हे दाखल केले आहेत, अशा वाहनांवर न्यायालयात खटले दाखल करण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी 3 मे पर्यंत लॉक डाऊनची परिस्थीती राहणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय काय होणार, याकडे पोलीस यंत्रणेचे लक्ष आहे. या निर्णयावरच वाहने परत देण्याची पुढील कार्यवाही अवलंबून असणार असल्याची माहिती पोलीस यंत्रणेकडून देण्यात आली.

अनेक दुचाकी मालक प्रतिक्षेत

पोलीस कारवाईत अनेक सर्वसामान्य नागरिकांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. सध्या सर्व वाहने बंद असल्यामुळे व हक्काचे वाहन पोलीसांच्या ताब्यात असल्यामुळे महत्वाचे काम असले तरी जाता येत नसल्याची परिस्थीती आहे. त्यामुळे अनेक दुचाकी मालक आपले वाहन ताब्यात कधी मिळणार या प्रतिक्षेत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीत सुरुवात! सेन्सेक्स 800 अंकांनी वाढला; आज 2 मोठे IPO बाजारात

Latest Marathi News Live Update : आखाती देशांतील संघर्षाचा परिणाम; तेल कंपन्यांकडून ब्रॅण्डेड पेट्रोलचे दर वाढवले

Jalna News: जालना जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट; शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान

Jalna News: जालना शेतकऱ्यांवर गारपीटचा मोठा फटका; रब्बी पिकांवर संकट

Koyna Dam Water Release : कृष्णाकाठची तहान भागणार! कोयना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू; 'या' तारखेला सांगलीत पोहोचणार पाणी

SCROLL FOR NEXT