कोल्हापूर : जिल्ह्यातील नागरिकांना कोरोनावर मात करण्याची शक्ती मिळो आणि कोरोनाचे संकट लवकरच दूर होवो. गणेशोत्सवात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्लाझ्मा दानसारखे उपक्रम राबवून उत्सव साजरा करावा, असे आवाहनही पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा मुख्य सोहळा झाला.
श्री. पाटील म्हणाले, ""कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा स्वातंत्र्य दिन देशभर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करुन साजरा होत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रुग्ण डिस्चार्ज होण्याचे प्रमाणही चांगले आहे. जिल्ह्यात कोरोना समूह संसर्गाचा धोका टाळण्यासाठी शासन-प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत आहेच, मात्र "आम्ही कोल्हापुरी- जगात भारी' ही उक्ती कोरोनाबाबतीत खरी ठरविण्यासाठी जनतेने आता प्रतिबंधक उपाययोजना कठोरपणे अंमलात आणून आपण, कुटुंब आणि समाजाला कोरोनापासून दूर ठेवण्याची गरज आहे.
जिल्ह्यात 12 हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेच्या पुढाकाराने कोरोना विरुध्दच्या युध्दात निश्चितपणे जिंकू, यावेळी सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.
*प्लाझ्मा थेरेपीने
25 अत्यवस्थांना जीवदान
कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोगही जिल्ह्यात यशस्वी झाल्याचे सांगून मंत्री म्हणाले, 60 दात्यांनी प्लाझ्मा दान केला आहे. यामुळे 25 अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळाले आहे.
* 7 हजार 332 बेडची उपलब्धता
सीपीआरमध्ये सध्या 429 बेड्सची व्यवस्था आहे, त्यापैकी 222 ऑक्सिजन बेड्स आहेत. आणखी 94 ऑक्सिजन बेड्स वाढविण्याचे काम सुरू आहे. आयसीयू बेड्स 73 असून आणखी 8 बेड्सची भर घातली जात आहे. त्याचबरोबर 66 व्हेंटिलेटर, 50 एनआयव्ही, 20 हाय फ्लो नेझल ऑक्सिजन सुविधा उपलब्ध आहेत.
वार्षिक योजनेसाठी
330 कोटींची तरतूद
* जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यंदा जिल्ह्यास सर्वसाधारण वार्षिक योजनेसाठी 330 कोटींची तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 130 कोटींचा विकास आराखडा मंजूर केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2019-20 साठी 13 कोटी 17 लाख तर चालू वर्षी 13 कोटी 25 लाख तरतूद केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.