Shoumika Mahadik vs Satej Patil  esakal
कोल्हापूर

Gokul Dudh Sangh : 'महाडिकांचे ठेके-टँकर एवढ्यापुरतेच त्यांचे ज्ञान मर्यादित'; शौमिका महाडिकांचा सतेज पाटलांना टोला

रणजित धुमाळ कोणाचा नातेवाईक आहे?

सकाळ डिजिटल टीम

सभेत आमच्या प्रश्नांना योग्य सन्मान दिल्यास व्यासपीठावरही बसू, असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर : दोन वर्षांत जिल्हा दूध (गोकुळ) संघाच्या बाराशे दूध संस्था काढल्या. मग, दूध संकलनात घट कशी? असा सवाल संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी उपस्थित केलाय.

सत्ताधाऱ्यांकडून छोट्या छोट्या गोष्टीतही राजकारण सुरू आहे. त्यामुळे दूध उत्पादक व संस्था ‘अमूल’कडे वळत आहेत. ठेवींची रक्कमही अहवालात कमी दिसते. हे असेच सुरू राहिले तर ‘गोकुळ’चा शेतकरी संघ व्हायला वेळ लागणार नाही, अशी टीका संघाच्या विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी केली.

आज (शुक्रवारी) संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा (Gokul Dudh Sangh) होत आहे. या पार्श्वभूमीवर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. दरम्यान, गेल्या वर्षीच्या सभेत आम्हाला बोलूही दिले नाही. आमच्यासमोरील माईक बंद ठेवले. सभेत आमच्या प्रश्नांना योग्य सन्मान दिल्यास व्यासपीठावरही बसू, असेही त्यांनी सांगितले.

शौमिका महाडिक म्हणाल्या, ‘सात सप्टेंबरपासून जिल्ह्यात संपर्क मेळावे केले. त्यातून सभासद संस्थांची तीव्र नाराजी दिसली. सभासद संस्थांनी आमच्या माध्यमातून दिलेले प्रश्नही घेतले नाहीत. त्यासाठीही आम्हाला सहकार विभागाकडे तक्रारी कराव्या लागल्या. त्यामुळे संस्थेच्या अध्यक्षांनी हे प्रश्न घेतले. पण, बोर्ड सेक्रेटरींना हे प्रश्न घ्यायचे नाहीत, हे कुणी सांगितले होते? रणजित धुमाळ कोणाचा नातेवाईक आहे?

त्यांच्याकडे कोणत्या विभागाचा ठेका आहे? जाणीवपूर्वक वासाचे दूध म्हणून दूध नाकारले जाते, हे सारे प्रश्न सभेत विचारणार आहे.’ संघाचे दूध संकलन २०२१ मध्ये ४४ कोटी ६२ लाख लिटर आणि दूधसंस्था चार हजार १९३ होत्या. नुकत्याच संपलेल्या ऑगस्टअखेर ४७ कोटी ४४ लाख लिटर आणि दूधसंस्था पाच हजार २०६ इतक्या आहेत.'

रोजचे दूध संकलन पाच लाख लिटरने कमी झाले आहे. कार्यक्षेत्राबाहेरील दूध खरेदीही पाच कोटींहून अधिक लिटर आहे. उलट संचालकांचा वाहतूक खर्च पन्नास लाखांवर पोचला आहे. निवडणुकीपूर्वी उदयाला आलेल्या गोकुळ कृती समितीलाही आता शोधावे लागत असल्याचे शौमिका महाडिक यांनी सांगितले. या वेळी संग्रामसिंह कुपेकर, दिलीप पाटील, प्रताप पाटील-कावणेकर, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

महाडिकांचे ठेके आणि टॅंकर एवढ्यापुरतेच ‘त्यांचे’ ज्ञान मर्यादित

संघाबाबत प्रश्न विचारल्यावर सतेज पाटील काही बोलत नाहीत. कारण संघ म्हणजे महाडिकांचे ठेके आणि टॅंकर एवढ्यापुरतेच त्यांचे ज्ञान मर्यादित आहे, असेही शौमिका महाडिक म्हणाल्या. सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची हीच योग्य वेळ असून, अधिकाधिक सभासदांनी सभेला उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT