Gokul Dudh Sangh Sabha
Gokul Dudh Sangh Sabha esakal
कोल्हापूर

Gokul Dudh Sangh : सतेज पाटलांची 'ती' युक्ती गंभीर, गोकुळने ठेका दिलेले रणजित धुमाळ कोण? शौमिका महाडिकांचा थेट सवाल

सकाळ डिजिटल टीम

सतेज पाटील यांनी घसा फोडून आम्ही वासाचे दूध परत करणार, आम्ही ते ओतून टाकतो, असे सांगितल्याचे मी ऐकले होते.

कोल्हापूर : ‘लोकांना अर्धसत्य सांगण्याची सतेज पाटील (Satej Patil) यांची युक्ती गंभीर असल्याचा आरोप करत गोकुळने ठेका दिलेले रणजित धुमाळ (Ranjit Dhumal) कोण’, असा प्रश्‍न ‘गोकुळ’च्या संचालक शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी येथे उपस्थित केला.

सर्वसाधारण सभेचा (Gokul Dudh Sangh Sabha) निषेध नोंदवत गोकुळच्या संस्था वाढल्या, दूध संकलन का वाढले नाही, अशी विचारणा त्यांनी केली. विरोधकांच्या भीतीने सत्ताधाऱ्यांनी तासाभरात सभा गुंडाळल्याचा आरोपही केला. ‘गोकुळ’ची सर्वसाधारण सभा झाल्यानंतर आयोजित समांतर सभेत त्या बोलत होत्या.

दरम्यान, ‘परत करा परत करा, वासाचे दूध परत करा’, ‘महाडिक महाडिक धूमधडाका’, ‘एकच अप्पा महाडिक अप्पा’, या घोषणांनी परिसर दणाणून गेला. गोकुळ शिरगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या परिसरात सभा झाली. दरम्यान, सभेत मंजूर झालेले विषय समांतर सभेत नामंजूर करण्यात आले.

शौमिका महाडिक म्हणाल्या, ‘गोकुळच्या संस्था वाढल्या असताना दूध संकलन का वाढलेले नाही, या प्रश्‍नावर आलेले उत्तर अर्धवट आहे. जरी राज्य शासनाने त्यांना मंजुरी दिली असली, तरी गोकुळने कोणत्या कायद्याच्या आधारे त्यांना ‘अ’ वर्ग सभासद करून घेतले? कारण ते मताला पात्र झाले आहेत. आमच्या साध्या प्रश्‍नांची उत्तरे अध्यक्षांना देता आली नाहीत. रणजित धुमाळ ही व्यक्ती कोण? त्यांच्यापूर्वी हा ठेका कोणाकडे होता? आणि तो ठेका काढून घेतल्यापासून धुमाळ यांच्या विक्रीचा आकडा सांगा.

तसेच पूर्वीच्या ठेकेदाराच्याही विक्रीचा आकडा सांगा, अशी मागणी केली होती. त्या प्रश्‍नावर पूर्वीचे वितरक महाडिकांशी संबंधित होते, असे सांगण्यात आले. मात्र, धुमाळ कोण हे शेवटपर्यंत सांगितले नाही. यापूर्वी महाडिकांच्या पाहुण्यांकडे ठेका होता, म्हणून तुम्ही सतेज पाटील यांच्या पाहुण्याकडे दिला का? हे स्पष्ट सांगायला हवे होते. एखादा ठेकेदार जर चांगले काम करत असेल, तर द्या त्यांना ठेका. आम्ही कोठे नाही म्हटलंय. पण ते सांगण्याचे त्यांच्याकडे धाडस नाही.’

त्या म्हणाल्या, ‘वासाचे दूध किती परत दिले? असा प्रश्‍न केला होता. अपेक्षेप्रमाणे वर्षभराचा आकडा सांगण्यात आला. या विषयावर संस्थांच्या तक्रारी होत्या. सभेत मात्र मोठा आकडा वाचून दाखवला. तुलनेत वासाच्या दुधाचा आकडा कमी होता. सतेज पाटील यांनी घसा फोडून आम्ही वासाचे दूध परत करणार, आम्ही ते ओतून टाकतो, असे सांगितल्याचे मी ऐकले होते. अजूनपर्यंत तरी कोणत्याही संस्थेचे वासाचे दूध परत केलेले नाही. ’

‘गोकुळ’मध्ये जे घडते ते उघड करायचे आहे

‘ठरावधारकांच्या बाजूने मी बाजू मांडू शकते की नाही? संचालकांनी चार भिंतीत बोलावे, हा कुठला नियम? सगळ्या गोष्टी चार भिंतीत करण्याची त्यांची पद्धत आहे. माझी नाही. मला जनतेसमोर जे गोकुळमध्ये घडते आहे ते उघड करायचे आहे’, असे महाडिक म्हणाल्या.

सभेत शौमिका महाडिक म्हणाल्या...

  • गोकुळच्या ऑडिट रिपोर्टमध्ये गंभीर ताशेरे व आर्थिक वर्ष भ्रष्टाचारात गेले.

  • सभा सुरू होताना राष्ट्रगीताचा अवमान झाला.

  • बचतगटाच्या महिला, महाविद्यालयीन मुले, हजेरीवर माणसे आणली.

  • प्रवेश पासावर सभासदांना सभेला सोडण्याची सिस्टीम कधी सुरू झाली?

  • सभेत एकसारखे अहवाल वाचन. मला माईकवर बोलू दिले नाही.

अन्य लोक आत, ठरावधारक बाहेर

‘ठरावधारकांना तासन्‌तास उन्हात उभे केल्यानंतर त्यांचा उद्रेक होणे स्वाभाविक आहे. त्यांच्यासोबत सभेत कोण घुसले, हे आम्ही कसे पाहणार? सभेकडे एक रांग करून माणसे सोडण्याची व्यवस्था होती. संचालक बसायला खुर्ची नव्हती. एका व्यक्तीला दहा पास देण्यात आले होते. पासवर अन्य लोक आत आणि ठरावधारक बाहेर, अशी स्थिती होती’, असा आरोप महाडिक यांनी केला.

४०० कोटींच्या ठेवी १६६ कोटींवर

‘महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू नसताना त्याचे विस्तारीकरण केले जाणार आहे. कोट्यवधी रुपये गुंतवणुकीचा घाट घातला जात आहे. आधी कारखाना पूर्ण क्षमतेने चालवा. गोकुळच्या ४०० कोटींच्या ठेवी १६६ कोटींवर आल्या आहेत. नव्या ठेवी झालेल्या नाहीत. संचालकांना ३० लाख खर्चाची मर्यादा असताना ५० लाख खर्च झाला आहे. त्याचा तपशील कोण देणार?’ असा प्रश्‍न महाडिक यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT