कोल्हापूर

सत्ता येताच सतेज पाटलांची घोषणा; गोकुळ उभारणार ऑक्सीजन प्लांट

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : गोकुळमध्ये सत्ता येताच अवघ्या दोन दिवसात गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी गोकुळ दूध संघ (kolhapur Gokul Dudh Sangh) ऑक्सीजन प्लांट (Gokul Oxygen Pant) उभारण्याची मोठी घोषणा केली आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज नूतन संचालक मंडळाची बैठक घेतली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर शेतकऱ्यांना दुधाला लिटरमागे २ रुपये दरवाढ देण्याची घोषणाही त्यांनी केली.

Gokul DUdh Sangh Set Up Oxygen Plant Information By Satej Patil kolhapur covid 19 update marathi news

पाटील म्हणाले, दोन महिन्याच्या कालावधीत दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण करणार आहोत. यासाठी दोन रुपये दूध दरवाढ देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. किमान दोन संचालक दररोज गोकुळच्या मुख्य कार्यालयातील दूध उत्पादकांना भेटतील असे ते म्हणाले.

असा आहे अजेंडा

पुढे ते म्हणाले, मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार आहोत. आता आमचा अजेंडा हाच असणार आहे. निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे दूध उत्पादकांना दोन रुपये दरवाढ देण्याचे आमचे प्रयत्न सुरू झाले असून दोन महिन्यात दरवाढ होईल. आमच्या शब्दाला आम्ही कुठेही मागे पडणार नाही. आम्हाला थोडा वेळ द्या. हा दूध संघ मल्टीस्टेट च्या माध्यमातून कोणाच्याही घशात जाऊ देणार नाही. यासाठी आमचे प्रयत्न राहतील.

Gokul DUdh Sangh Set Up Oxygen Plant Information By Satej Patil kolhapur covid 19 update marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke: सरकारी शाळांसाठी किती निधी? किती पदे रिक्त? अभिजीत दीपकेंनी शिक्षण मंत्र्यांना विचारले ६ सवाल, माहिती देण्याचे आवाहन

रेल्वेच्या चादरी घेऊन बाजारात फिरले अन् कॅमेऱ्यात कैद झाले; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केली कारवाईची मागणी

IND vs SL 2nd Test: ध्रुव जुरेलची शतकी खेळी! भारताची पाचशे धावांच्या दिशेने वाटचाल; हार्दिक पांड्यानंतर असा पराक्रम करणारा पहिला

Marathi News Live Updates : परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी रशियातील मॉस्को येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली

झी मराठीवर येतेय नवी मालिका ‘धाकट्या सूनबाई’! प्रेमाची नवी गोष्ट लवकरच, कोण आहे नायिका?

SCROLL FOR NEXT