gokul election kolhapur MLA prakash abitkar nominate on gokul marathi news
gokul election kolhapur MLA prakash abitkar nominate on gokul marathi news 
कोल्हापूर

गोकुळच्या निवडणुकीत आबिटकरांसाठी आता फिल्डिंग ; सत्तारूढ गटाच्या हालचालीला सुरुवात

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गोकुळच्या निवडणुकीत माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांच्या पाठिंब्यानंतर आता सत्तारूढ गटाने जागा वाटपावरून नाराज असलेले आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. आबिटकर सध्या मुंबईत आहेत, ते परतल्यानंतर याचा निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

आमदार विनय कोरे यांनी विरोधी शाहू शेतकरी विकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी  सरूडकर या आघाडीसोबत जाणार होते; पण पारंपरिक विरोधकच सोबत असतील तर तालुक्‍यात काम करता येणार नाही, अशा भावना शाहूवाडी व पन्हाळा तालुक्‍यातील शिवसैनिकांतून व्यक्त झाल्या. त्यातून सरूडकर यांनी आज सत्तारूढ आघाडीसोबत जात असल्याची घोषणा आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या उपस्थितीत केली.

जागा वाटपावरून राधानगरी-भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर हेही नाराज असल्याचे समजते. त्यांनी विरोधी आघाडीकडे दोन जागांची मागणी केली आहे; पण त्या मिळणार नाहीत असे संकेत मिळाल्यानंतर या आघाडीच्या घोषणेदिवशीच त्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. दुसरीकडे तालुक्‍यातील त्यांचे विरोधक राष्ट्रवादीचे ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील आणि अरुण डोंगळे हे तिघेही या आघाडीत आहेत.

आपले विरोधकच सोबत असतील तर त्यांच्यासोबत जाऊ नये अशा भावना त्यांच्याही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. 
 आबिटकर यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे व के. जी. नांदेकर यांच्यासाठी जागा मागितली आहे; पण यापैकी कोणालाही जागा मिळण्याची शक्‍यता नाही. त्यातून तेही सत्तारूढ आघाडीसोबत जातील, अशी शक्‍यता आहे. त्यासाठी सत्तारूढ गटाच्या नेत्यांनीही त्यांच्याशी संपर्क सुरू केला आहे. 

कार्यकर्त्यांशी चर्चेनंतर निर्णय
मी सध्या कामानिमित्त मुंबईत आहे. या निवडणुकीत कोणासोबत जायचे, याचा निर्णय झालेला नाही. एक-दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल, असे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

संपादन- अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल प्रकरणात CM केजरीवाल अन् त्यांच्या पत्नीची चौकशी होणार, महिला आयोग आक्रमक!

Darjeeling Tea: किंमती वाढल्या पण निर्यात घटली; दार्जिलिंग चहा संकटात का आहे?

JEE Advanced Admit Card 2024 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज मिळणार; असे करा डाऊनलोड

Pakistan Espionage Case : पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी फरार मुख्य आरोपीला अटक; NIA ची कर्नाटकात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

SCROLL FOR NEXT