कोल्हापूर

गोकुळ दूध विक्रीचा नवा उच्‍चांक; 1 दिवसांत 15 लाख लिटर्सचे वितरण

गोकुळने बकरी ईदनिमित्त एका दिवसात १५ लाख २५ हजार लिटर्स इतकी दूध विक्री केली

सुनील पाटील

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाने (गोकुळ) उत्‍पादक व ग्राहकांचा विश्‍वास संपादन करून त्‍यांना जास्‍तीत जास्‍त लाभ करून देण्‍यासाठी नेहमीच प्रयत्न केलेला आहे. त्‍यामुळेच गोकुळच्‍या दररोजच्‍या दूध संकलनासह विक्रीत सातत्‍याने वाढ होत आहे. यावर्षी गोकुळने बकरी ईदनिमित्त एका दिवसात १५ लाख २५ हजार लिटर्स इतकी दूध विक्री केली आहे. गोकुळने यावर्षी दूध विक्रीचा नविन उच्‍चांक गाठला असल्याची माहिती गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाले, गोकुळने गेल्यावर्षी याच दिवशी म्‍हणजे ईदच्‍या दिवशी १२ लाख ६२ हजार लिटर्स इतकी दूध विक्री केली होती. यावर्षी यामध्ये 2 लाख 63 हजार लिटर दुधाची विक्री वाढली आहे. या कौतुकास्‍पद कामगिरी बद्दल जिल्‍ह्याचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व जिल्‍ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी गोकुळ व्‍यवस्‍थानाचे कौतुक केले आहे. चांगले नियोजन आणि योग्य कारभार करत गोकुळने दूध विक्रीमध्‍ये नविन मानदंड प्रस्‍तापित केला आहे.

गोकुळने नेहमीच चढता आलेख ठेवला आहे. गोकुळने दिवसाला २० लाख लिटर्स दूध संकलन व तितकीच विक्री करण्‍याचे उद्दिष्‍ट्य ठेवले असून हे उद्दिष्‍ट गोकुळ दूध उत्‍पादक व ग्राहकांच्‍या विश्वासार्हतेवर साध्‍य केला जाईल. या यशामध्‍ये गोकुळचे दूधउत्‍पादक, दुधसंस्था, ग्राहक, वितरक व कर्मचारी यांचे योगदान मोलाचे असल्‍यामुळे ते कौतुकास पात्र असल्याचेही त्यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले. तसेच चेअरमन विश्‍वास पाटील यांनी गोकुळ परिवाराच्या वतीने मुस्‍लीम बांधवाना ईदच्‍या शुभेच्‍छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

iPhone 18 Pro: Apple चा 'Surprise and Shine' इव्हेंट आज! पहिला फोल्डेबल फोन येणार? जाणून घ्या कधी अन् कुठे पाहायचा LIVE

SCROLL FOR NEXT