Gold biscuits esakal
कोल्हापूर

Kolhapur Gold Biscuits : तळ्याकाठी खेळताना मुलांना सापडली 24 लाख किमतीची सोन्याची बिस्किटे; 'त्यांना' सुगावा लागताच..

तळ्याकाठी खेळत असलेल्या मुलांना गवतामध्ये प्लास्टिक पिशवीत ३९४ ग्रॅम वजनाचे सोने सापडले.

सकाळ डिजिटल टीम

गडमुडशिंगी येथे बेवारस स्थितीत सापडलेली सोन्याची बिस्किटे, नाणी कोणाची असावीत, याची पंचक्रोशीमध्ये चर्चा सुरू होती.

Gandhinagar News : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे तळ्याकाठी खेळत असलेल्या मुलांना गवतामध्ये प्लास्टिक पिशवीत ३९४ ग्रॅम वजनाचे सोने सापडले. यामध्ये सोन्याची बिस्किटे (Golden Biscuits) आणि नाण्यांचा समावेश आहे. त्याची बाजारभावानुसार किंमत २४ लाख २९ हजार ५०० रुपये इतकी आहे.

गांधीनगर पोलिसांना (Gandhinagar Police) सुगावा लागताच त्यांनी ती ताब्यात घेतली. संबंधित सोन्यावर अद्याप कोणीही हक्क दाखविण्यासाठी पुढे आलेले नाही. त्यामुळे बेवारस सापडलेले सोने कोणाचे, अशी चर्चा गांधीनगरात सुरू आहे.

याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी : गडमुडशिंगीतील (Gadmudshingi) तळ्याजवळ १६ जुलै रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास रोहित विश्वास गडकरी, ऋषिकेश विश्वास गडकरी, चेतन सुभाष गवळी आणि नागेश महेश कांबळे ही लहान मुले खेळत होती. त्यांना गवतात प्लास्टिकची पिशवी सापडली. त्यात सोनेरी चौकोनी लहान-मोठी बिस्किटे आणि नाणी होती.

त्यांनी पिशवी तशीच गावातीलच विश्वास गडकरी यांच्याकडे दिली; पण तळ्याकाठी सोन्याची बिस्किटे आणि नाणी याची चर्चा गावात सुरू झाली. त्याची चाहूल गांधीनगर पोलिसांना लागताच त्यांनी याचा गोपनीय तपास करत विश्वास गडकरी आणि सुभाष गवळी यांचे घर गाठले. त्याच्याकडे सखोल चौकशी करताना सोने सापडल्याचे सत्य उघड झाले.

पोलिसांनी गडकरी यांच्या ताब्यातून सारा ऐवज ताब्यात घेतला. याची गांधीनगर पोलिस ठाण्यात रीतसर नोंद केली. सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे-पाटील, हेडकॉन्स्टेबल बजरंग हेब्बाळकर, संदीप कुंभार, चेतन बोंगाळे, संतोष कांबळे यांनी या प्रकरणाचा उलगडा केला.

काय होते पिशवीत?

  • ३२९.४०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्किट

  • १० ग्रॅम वजनाची ४ सोन्याची बिस्किटे

  • १० ग्रॅम वजनाची २ नाणी

  • ५ ग्रॅम वजनाचे एक नाणे

सोनाराकडून सत्यता तपासली

पोलिसांनी सर्व सोने खरे आहे की नाही, याची शहानिशा करण्यासाठी गांधीनगर येथील एका ज्वेलरी दुकानातून तपासणी केली. त्यावेळी सोने खरे असल्याचे स्पष्ट झाले.

परिसरात एकच चर्चा

गडमुडशिंगी येथे बेवारस स्थितीत सापडलेली सोन्याची बिस्किटे, नाणी कोणाची असावीत, याची पंचक्रोशीमध्ये चर्चा सुरू होती. मालकी हक्क दाखविण्यासाठी अद्यापतरी कोणीही पुढे आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT