gold theft to corona positive women in kolhapur
gold theft to corona positive women in kolhapur 
कोल्हापूर

धक्कादायक ; कोरोनाबाधित महिलेच्या दागिन्यांवर डल्ला 

राजेश मोरे

कोल्हापूर - उपचार घेणाऱ्या कोरोनाग्रस्त महिलेच्या अंगावरील सात तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. महाराणा प्रताप चौक परिसरातील एका रुग्णालयात हा प्रकार घडला. गेल्या महिन्याभरातील अशा पद्धतीने चोरी होण्याचा हा दुसरा प्रकार ठरला. याबाबत लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात एका अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, कदमवाडी परिसरातील एक महिलेला कोरोनाची बाधा झाली. त्या महिलेला नातेवाईकांनी महाराणा प्रताप चौक परिसरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या महिलेला 14 सप्टेंबरला रुग्णालयातील अति दक्षता विभागात हलविण्यात आले. त्यावेळी त्या महिलेच्या अंगावरील असणारे चार तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या, दोन तोळ्याचे मंगळसूत्र, आठ ग्रॅमचे कर्णफुले, कानातील बुगडी असे दोन लाख 59 हजार रूपये किमंतीचे सुमारे सात तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबधित महिलेच्या नातेवाईकांनी याबाबतची फिर्याद बुधवारी लक्ष्मीपुरी पोलिसात दिली. त्यानुसार पोलिस ठाण्यात एका अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

शहरातील दुसरा प्रकार 
कोरोनाग्रस्त महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिन्यावर डल्ला मारण्याचा हा दुसरा प्रकार ठरला. महिन्याभरापूर्वी शिवाजी पार्क परिसरातील एका रुग्णालयातही असाच प्रकार घडला होता. याची गंभीर दखल पोलिस प्रशासनाने घेतली असून रुग्णालयासह परिसरातील सीसी टीव्ही आधारे संशयित महिलेचा शोध ते घेत आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईने जिंकली नाणेफेक! जाणून घ्या दोन्ही संघाची प्लेइंग ११

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला अन्..; पाहा व्हिडिओ

'श..श...शशांक...', KKR विरुद्ध विजयानंतर पंजाबच्या पठ्ठ्यानं शाहरुखच्या स्टाईलमध्ये ईडन गार्डन्सचे मानले आभार, पाहा Video

Bank Crisis: मोठ्या आर्थिक संकटाची सुरुवात? अमेरिकेत आणखी एक बँक दिवाळखोर; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT