the goods of tramboli form kolhapur festival cancelled for corona pracation in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात उद्याची त्र्यंबोली यात्रा रद्द

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (२१) होणारा ललिता पंचमीचा सोहळा साध्या पद्धतीने होणार आहे. मोजक्‍याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत कोहळा फोडण्याचा पारंपरिक विधी होणार आहे. तत्पूर्वी, करवीरनिवासिनी श्री अंबाबाई, तुळजाभवानी आणि गुरूमहाराज वाड्यातील पालख्या सजवलेल्या वाहनांतून टेंबलाई टेकडीकडे जाणार आहेत. दरम्यान, या सोहळ्याच्या निमित्ताने भरणारी त्र्यंबोली यात्राही यंदा रद्द केली आहे. 

ललिता पंचमी म्हणजे कोहळा पंचमी. ललिता पंचमीच्याच दिवशी श्री अंबाबाईने कोल्हासुराचा वध केला. त्यामुळे त्र्यंबोली देवीच्या प्रतीकरूप कुमारीच्या पूजनानंतर तिच्या साक्षीने कोहळा फोडला (कुष्मांड बळी) जातो. परंपरेनुसार कुमारीपूजनाचा मान गुरव घराण्याकडे आहे. श्रीमंत छत्रपतींच्या हस्ते कुमारीपूजन झाल्यानंतर कुमारिकेच्या हस्ते त्रिशूलाने कुष्मांड बळीचा पारंपरिक सोहळा होतो.

बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास तोफेची सलामी दिल्यानंतर करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची पालखी पूर्व दरवाजातून भवानी मंडपात येईल. तेथून फुलांनी सजवलेल्या वाहनातून पालखी टेंबलाई टेकडीकडे रवाना होईल. त्या पाठोपाठ तुळजाभवानी आणि गुरूमहाराज वाड्यातील पालख्या बाहेर पडतील. शिवाजी चौक, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज, बागल चौक, कमला कॉलेजमार्गे टेंबलाई टेकडी असा पारंपरिक मार्ग राहील.

अंबाबाईची पालखी शाहू मिल, टाकाळा येथे काही काळ थांबेल; पण या ठिकाणीही गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार आहे. टेंबलाई मंदिर कमानीजवळ सजवलेल्या वाहनांतून पालख्या आल्यानंतर तेथून मंदिरात चालत पालख्या नेल्या जातील आणि त्यानंतर कोहळा फोडण्याचा विधी होईल. दरम्यान, अंबाबाईच्या पालखीच्या पुढे व मागे पोलिसांची वाहने आणि देवस्थान समिती व श्रीपूजकांची वाहने असतील.

कुमारिका पूजनाचा मान

कोहळा फोडण्याच्या पारंपरिक विधीमध्ये कुमारिका पूजनाचा मान कृष्णा महादेव गुरव यांच्या घराण्याकडे आहे. यंदाच्या सोहळ्यात हा मान निधी श्रीकांत गुरव हिला मिळणार आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महत्त्वाची अपडेट! राष्ट्रीय महामार्गावरील पश्चिमेकडील पूल वाहतुकीसाठी बंद होणार? पंचगंगा पुलावर दुहेरी वाहतुकीची चाचणी, पर्यायी मार्ग कोणते?

मोहम्मद सिराजला मिळाला ICC चा मोठा पुरस्कार; म्हणाला, 'हा सन्मान फक्त माझा नाही, तर...'

मला माझ्या पद्धतीने जगायचंय... सिनेसृष्टीतून निवृत्त होणार नाना पाटेकर? नाम फाउंडेशनही केलं 'या' व्यक्तीच्या स्वाधीन

Photos : सूर्याला पडले ५ लाख किमी रुंदीचे भगदाड; फुलपाखरू सारखा आकार, नासाने धक्कादायक फोटो केले शेअर

"माझ्या आयुष्यात ती आली" महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम निखिल बनेने दिली आनंदाची बातमी, PHOTO VIRAL !

SCROLL FOR NEXT