The Government Has Yet To Provide Seeds To The Farmers Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

शासनाकडून शेतकऱ्यांना अद्याप तागाचे बियाणे नाहीच

अशोक तोरस्कर

उत्तूर : जमिनीचा पोत वाढवणारे ताग पिकाचे क्षेत्र उत्तूर (ता. आजरा) परिसरात या वर्षी घटले आहे. शासनाकडून अद्याप बियाणे उपलब्ध झालेले नाही. यामुळे दरवर्षी 10 हेक्‍टर क्षेत्रावर होणारे पीक केवळ दोन ते तीन हेक्‍टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पीक घेतले आहे. ताग हे सर्व प्रकारच्या जमिनीत उत्तम कस वाढणारे हिरवळीचे खत आहे.

पेरणी झाल्यानंतर पाच ते सहा आठवड्यांनी गाडल्यानंतर हेक्‍टरी सर्वसाधारणपणे 17.5 ते 20 टन सेंद्रिय खत मिळते. त्यापासून 60 ते 100किलो प्रतिहेक्‍टरी नत्र प्राप्त होते. त्याचबरोबर इतर मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्येही पुढील पिकांना उपलब्ध होतात. शेण खताला पर्याय म्हणून शेतकऱ्यांचा हे पीक घेण्याकडे कल वाढला होता. 

तागाचे फायदे 
- हिरवळीच्या खतांमध्ये ह्युमस नावाचे सेंद्रिय द्रव्य असते, त्यामुळे मातीला काळा रंग येतो 
- खतामधील सेंद्रिय द्रव्यांमुळे जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंना अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते 
- जीवाणूंची वाढ भरपूर होऊन त्यांची कार्यशक्ती जोमाने वाढते 
- जमिनीतील पोषक द्रव्ये रासायनिक क्रियेने विरघळून ती पिकांना सुलभ स्थितीत मिळतात 

मागणी केली आहे
गेल्यावर्षी शासनाकडून ताग बियाणे उपलब्ध झाले होते. यामुळे 10 हेक्‍टर क्षेत्रावर याची लागवड झाली होती. या वर्षी मागणी केली आहे, मात्र अद्याप पुरवठा झालेला नाही. शासनाकडून बियाणे उपलब्ध होताच ते शेतकऱ्यांना देण्यात येईल. 
- शिवाजी गडकरी, कृषी सहायक, उत्तूर 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT