Governor Bhagat Singh Koshari say Drunkenness is bigger than Taj Mahal 
कोल्हापूर

नशाबंदी ताजमहलापेक्षाही मोठे काम : राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - खोटे बोलणे थोडे कमी केले आणि नशाबंदीचा त्याग केला तर ताजमहल उभारण्यापेक्षाही ते मोठे काम होऊ शकेल, असा विश्‍वास राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी आज व्यक्त केला. आचार्य महाश्रमणजी यांच्या अहिंसा यात्रेच्या निमित्ताने भक्तीपूजा नगर येथे सकाळी कार्यक्रम झाला. राज्यस्तरीय नागरिक अभिनंदन समारोहच्या निमित्ताने ते बोलत होते. जैन श्‍वेतांबर तेरापंथी सभेने कार्यक्रमाचे आयोजन केले. व्यासपीठावर महाश्रमणजी, महापौर निलोफर आजरेकर, साध्वी उपस्थित होते. 

राज्यपाल बसले खाली

कोश्‍यारी यांनी प्रोटोकॉल सोडून महाश्रमणजी यांच्यासोबत खाली बसणे पसंत केले. अर्ध्या तासाच्या भाषणात श्री.कोश्‍यारी यांनी उत्स्फूतपणे भावनांना वाट मोकळी करून दिली. 
ते म्हणाले, महाश्रमणजी यांचे विचार ऐकण्याची संधी मिळते, हा सौभाग्याचा क्षण आहे. तुमच्यासारख्या सन्मार्गावरून चालणाऱ्या सोबत येण्याची संधी मिळते, हेही महत्वाचे आहे. सदभावना, नैतिकता आमि नशामुक्तीचा संदेश देत अहिसा यात्रा फिरते आहे. 

भारत एक विलक्षण देश आहे. महाराष्ट्रात कोकणात सर्वाधिक पाऊस पडतो. तर विदर्भ मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. विविधता हेच प्रांताचे वैशिष्टय आहे. ज्यांच्या साम्राज्याचा सुर्याचा अस्त होत नाही, असे म्हटले जात होते. त्यांच्याही साम्राज्याचा अस्त अखेर झालाच. ते म्हणाले, त्यागातच सर्वाधिक सुख आहे. मी एखाद्याला उपदेश करायला गेलो तर त्याचा प्रभाव पडणार नाही. मात्र महाश्रमणजीनी एखादी गोष्ट सांगितली चर त्यांचा प्रभाव लगेच पडतो. जे पैशाला स्पर्शदेखील करत नाही, अशांच्या संगतीत आपण सध्या आहोत. त्यांच्या सहसावात राहिल्यानंतर थोडा वेळ का असेना, आत्म्याची शुद्धता होते. साधू, संत, मुनींची प्रवृत्ती ही समाजाच्या हिताची असते. 

महाश्रमणजी म्हणाले, बाहय सौंदयापेक्षा आंतरिक समाधान हेच खरे जीवनाचे मूल्य आहे. दान आणि सेवा हे हाताचे काम आहे. खरे बोलणे हे मुखाचे काम आहे. स्वच्छ विचार हे ह्रदयाचे तर भुजा मजबूत असणे ही आणि त्याचा चांगल्या कामासाठी वापर होणे महत्वाचे आहे.  नैतिकता, नशामुक्ती, सदभावना ही जीवनमूल्ये आहेत. यावेळी विजयराव पैराणी, साध्वी, महापौर निलोफर आजरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. आनंद पगारिया यांनी संयोजन केले. उपमहापौर संजय मोहिते, संजय शेटे, जयेश ओसवाल, ललीत गांधी, राहूल चिक्कोडे, नगरसेवक ईश्‍वर परमार, तौफिक मुल्लाणी आदी उपस्थित होते 

डिजीटल नव्हे व्हिजीटर 

संसदेत खासदारांना डिजीटल व्हा, असा संदेश दिला गेला. मी मात्र व्हिजीटर होणे पसंत केले. लोकात मिसळणे त्यांना भेटणे हेच महत्वाचे असल्याचे राज्यपाल कोश्‍यारी यांनी सांगितले. पतप्रधांनानी योग दिन जाहीर केला आणि जगातील बहुतांशी देशानी त्याची अंमलबजावणी केली. दरम्यान कार्यक्रम संपल्यांनंतर राज्यपालांनी महाश्रमणजी यांच्यासोबत पायी चालत ते अंहिसा यात्रेत सहभागी झाले. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT