Govind Pansare Esakal
कोल्हापूर

Govind Pansare Case; पानसरे हत्या प्रकरणी 2 मार्चला पुढील सुनावणी

न्यायालयात सादर केलेले सर्व पुरावे देण्याबाबत सरकार पक्षातर्फे सहमती दर्शविण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : काही महत्त्वाच्या कागदपत्रांसह इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची माहिती सरकार पक्षातर्फे मिळावी, असा अर्ज आज ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे (Govind Pansare) हत्या प्रकरणातील संशयित आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात सादर केला. यावर झालेल्या सुनावणीत 23 तारखेपासून आज पर्यंत न्यायालयात सादर केलेले सर्व पुरावे देण्याबाबत सरकार पक्षातर्फे सहमती दर्शविण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके (B.D.Shelke) यांच्या न्यायालयात (Court)ही सुनावणी झाली. पुढील सुनावणी दोन मार्चला होईल.

न्यायालयात सादर केलेले सर्व पुरावे देण्याबाबत सरकार पक्षातर्फे सहमती दर्शविण्यात आली.

दोषारोप निश्चित करण्यासंदर्भात मागील सुनावणीवेळी आरोपीचे वकील समीर पटवर्धन (Sameer Patwardhan) यांनी तिन्ही आरोपींना दोषमुक्त करावे असा अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी होईल अशी शक्यता होती मात्र, ॲड.पटवर्धन आजारी असल्यामुळे ते आज न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. त्यांच्या ठिकाणी ॲड.वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी न्यायालयात हजर राहून दोषारोप निश्चित करण्यापूर्वी सरकार पक्षाकडून काही महत्त्वाच्या पुराव्याची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक्स पुरावे आम्हाला मिळालेले नाहीत ते मिळावेत अशी मागणी न्यायालयाकडे केली.

यावेळी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे (Shivajirao Rane) यांनी जसा तपास होईल त्या पद्धतीचे पुरावे दोषारोप पत्रामध्ये दाखल केले आहेत, तरीही काही पुरावे आरोपींना मिळाले नसले तर ते देण्याची व्यवस्था केली जाईल असे स्पष्ट केले. यानंतर ॲड. इचलकरंजीकर यांनी पुरावे मिळाल्यानंतर काही दिवसांनी सुनावणी घ्यावी, अशी मागणी केली.यावर वकील राणे आणि इचलकरंजीकर यांनी पुढील सुनावणी 2 मार्चला व्हावी अशी मागणी न्यायालयाकडे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

SCROLL FOR NEXT