hapus mango enter at kolhapur market 
कोल्हापूर

हापूस आला कोल्हापुरात....

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - यंदाच्या हंगामातील हापूस आंबा कोल्हापूरच्या घाऊक बाजारपेठेत दाखल झाला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत या आंब्याचा मुहूर्ताचा सौदा होणार आहेत. 
शाहू मार्केट यार्डातील फळ बाजारात हापूस आंबे दरवर्षी विक्रीसाठी येतात. त्यानुसार यंदाही रत्नागिरी हापूस आंब्याची आवक झाली आहे. दोन अडत्यांकडे हा आंबा आला आहे. तो पूर्ण पिकल्यानंतरच त्याचे मुहूर्ताचे सौदे होणार आहेत, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

हापूस आंब्याची आवक सुरू

दरम्यान, यंदा कोकणी आंब्याला हवामानाची साथ चांगली मिळाल्याने आंबा उत्पादन चांगल्या प्रमाणात झाले आहे. पहिल्या पेट्या मुंबई बाजारपेठेकडे रवाना झाल्या आहेत. 
त्यापाठोपाठ कोल्हापूर बाजारपेठेकडे आंबा पाठविला जात आहे. गेल्या आठ-दहा दिवसांत धुक्‍याचे प्रमाण वाढले. त्यामुळे आंबा काढणी काही दिवस लांबणीवर पडली. त्यामुळे अजूनही दहा-पंधरा दिवसांनंतर पूर्ण क्षमतेने कोल्हापूरकडे हापूस आंब्याची आवक सुरू होणार आहे.

गतवर्षी फेब्रुवारी, मार्च महिन्यात दोन हजार रुपये असा पेटीचा भाव होता. हंगामाच्या मध्यापर्यंत आवक कमी असल्याने भाव जास्त राहीला. यंदा मात्र पुरेषा प्रमाणात आवक होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भाव नियंत्रणात राहतील. त्यामुळे आंबा खवय्यांना यंदा पुरेषा प्रमाणात आंब्याची चव चाखता 
येणार आहे.

कोल्हापुरात आंब्याची मोठी उलाढाल 

कोकणापासून कोल्हापूर जवळच आहे. त्यामुळे सावंतवाडी, कुडाळ, देवगड, मालवण, देवरूख, साखरपा, रत्नागिरी, चिपळूण या भागातून मोठ्या प्रमाणात देवगड व रत्नागिरी हापूस आंब्यांची आवक होते. दरवर्षी किमान अडीच लाख पेट्यांची दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांची उलाढाल येथील बाजारपेठेत होते. यात अलिकडच्या काळात चेन्नई, कारवार, धारवाड, खानापूर या भागातूनही आंबा येतो. तोही हापूसला पर्याय म्हणून येथे वापरला जातो, त्याचे भाव कोकणी हापूस आंब्याच्या तुलनेत कमी असतात.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मुश्रीफ सांगतील तेच, अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला तर भाजपकडून महाडिकांच्या विश्वासू शिलेदाराची निवड

अरे वाह! 'पारु' मालिकेनंतर प्रसाद जवादेला मिळाली नवी मालिका, पूर्वा कौशिकसोबत नवी जोडी, प्रोमो Viral

Latest Marathi News Live Update : दिल्लीत एका व्यक्तीने पिस्तूल लोड करताना असताना स्वतःवरच गोळी झाडली

Suryakumar Yadav: कसोटीबाबत तळमळ; पण... टी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवचे पारंपरिक क्रिकेटबाबत मत

Shri Guru Paduka Darshan Mahotsav : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्कंठा,स्वामी स्वरूपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्‍घाटन, गुरू श्री एम यांचे रविवारी व्याख्यान

SCROLL FOR NEXT