कोल्हापूर

'चंद्रकांतदादांकडून मराठा आंदोलकांना उकसवण्याचं काम'

अवधूत पाटील

गडहिंग्लज (कोल्हापूर) : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी(maratha reservation) संभाजीराजेंनी (sambhajiraje)आंदोलनाची भूमिका घेतली आहे. कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे ते संयम राखून आहेत. मात्र, चंद्रकांतदादांकडून (chandrkant patil)आंदोलकांना उकसवण्याचे काम सुरू आहे, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(hasan mushrif) यांनी केली. संभाजीराजेंच्या संयमी नेतृत्वाखालीच लढा यशस्वी होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.कोरोना संदर्भातील आढावा बैठकीसाठी मुश्रीफ गडहिंग्लजला आले होते. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेचा समाचार घेतला.

(hasan-mushrif-criticism-on-chandrakant-patil-political-marathi-news)

मुश्रीफ म्हणाले,“चंद्रकांतदादांना नेमके काय झाले आहे माहित नाही. सत्ता गेल्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात संभाजीराजेंनी घेतलेली भूमिका योग्य आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत नागरिकांना काय त्रास झाला याची कल्पना त्यांना आहे. त्यामुळे संभाजीराजे संयमाने जात आहेत. सध्या अशाच सयंमी नेतृत्वाची गरज आहे. मात्र, चंद्रकांतदादा लोकांना मोर्चा, आंदोलन करण्यासाठी उकसवण्याचे काम करीत आहेत.

पडेल ती किंमत मोजेल...

मुश्रीफ म्हणाले,“मराठा आरक्षणाचा पेच घटनात्मक आहे. मात्र, नोकरी व शिक्षणातील आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत मराठा समाजाला दिलासा देण्याचा शासनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार पडेल ती किंमत मोजेल.”

...पर वचन न जाए

पीककर्जाची परतफेड करणार्‍या प्रामाणिक शेतकर्‍यांना दोन वर्षांपासून प्रोत्साहन रक्कम मिळाली नसल्याबाबतचे वृत्त आज (ता.१२) ’सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. याबाबत मुश्रीफ म्हणाले,“कोरोनामुळे शासनाचे आर्थिक स्रोत घटले आहेत. त्याचा परिणाम सरकारी तिजोरीवर झाला आहे. पण, प्रामाणिक शेतकर्‍यांना प्रोत्साहन रक्कम निश्‍चित दिली जाईल. जान जाए पर वचन न जाए.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT