कोल्हापूर : कागदावर चित्र काढणे सोपे, चित्र व्यवस्थित झाले नाही तरी ते खोडता येते; मात्र भिंतीवर चित्र काढताना ते खोडता येत नाही. चित्र न खोडता, वेडेवाकडे न करता ते एकसाथ भिंतीवर चित्र काढणे ही कला आहे. ही कला तेजस विजय सावंत यांनी आत्मसात केली आहे. तेजसने बंगल्यात अनेक खोल्यांत भिंतीवर अशी चित्रे काढली आहेत. भिंतीवर चित्र काढताना पोस्टल, फॅब्रिक कलरचा वापर केला जातो. हे रंग खराब होत नाहीत.
करवीर पंचायत समितीच्या मागील बाजूस सीता कॉलनीत तेजसच्या "जयश्री' बंगल्यात स्वत:चा स्टुडिओ आहे. न्यू कॉलेजमधून आर्किटेक्चर पूर्ण केले; पण लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. तेजसने अशी चित्रे कागदावर रेखाटली. तो म्हणतो,""कागदावर चित्र काढणे अवघड नाही; पण भिंतीवर चित्र काढून पूर्ण करणे कठीण आहे.'' आर्किटेक्चर शिक्षण पूर्ण केल्यानंतर चित्रपटनिर्मिती कशी केली जाते? कोणत्या तंत्राने चित्रपट पूर्ण होतो, इकडे लक्ष गेले. सिनेमॅटॉग्रॉफी कोर्स करायचे ठरविले. अमेरिकेतील न्युयॉर्क फिल्म ऍकॅडमीत तेजसला ऍडमिशन मिळाले; मात्र, कोरोनाच्या प्रभावामुळे अमेरिकेला तो जाऊ शकला नाही. तत्पूर्वी, मुंबई फिल्म ऍकॅडमीत प्रोफेशनल प्रॅक्टिस अन् इंटर्नशिपसाठी सुरू केली. आतापर्यंत सहा ते सात शॉर्टफिल्मस् तयार केल्या आहेत.
तो म्हणतो, ""सिनेमॅटोग्राफी म्हणजे, एखादे पिक्चरचे सीन्स् डिझाईन करावे लागतात. तेही कॅमेरा आणि लाईटस्च्या माध्यमातून. यासाठी ऍरी ऍलेक्स, रेड ड्रॅगन कॅमेरे वापरले जातात. मी ही सर्व तंत्रे शिकलो. लॉकडाउनमुळे मुंबईत जाता आले नाही. यासाठी मी फिल्म एडिटिंग, ऍनिमेशन (व्हीएफएक्स) तंत्रावर कामा सुरु आहे. मी फायनल कट हे सॉफ्टवेअर शिकलो. यासाठी आजी-आजोबा, आई-वडिलांनी सॉफ्टवेअर्स, कॅमेरा, लॅपटॉप घेऊन दिला.'' हे करताना तेजस हा 2015 मध्ये भिंतीवर चित्रे काढण्याची प्रॅक्टिस करू लागला.
तो म्हणतो, ""मी पहिल्यांदा रोनाल्डोचे चित्र काढले. मग जॉनी डिप, आयर्न मॅन (टोनी स्टार) रेखाटला. पोट्रेट करण्यावर लक्ष केंद्रित केले. यानंतर मी ग्रॅन्ड स्केलवर मार्व्हलची ऍव्हेंजर सीरीज भिंतीवर चित्रीत केली. ही सीरीज चार मीटर बाय साडेतीन मीटर अशी आहे. यामध्ये हिरो, व्हिलन अशी 34 पात्रे आहेत.''
सिनेमॅटोग्राफीमध्येच करिअर...
पुढील करिअर सिनेमॅटोग्राफीमध्येच करायचे आहे, असे ते म्हणतो. आतापर्यंत मित्रांच्या घरी, कॉलेजमध्ये तेजसने भिंतीवर चित्रे काढली आहेत. गणेश चतुर्थीला तो मूर्तीच्या मागील डेकोरेशन, थ्रीडी लाईटस् अशी माध्यमे वापरून तो चित्रे काढतो. जेव्हा घरात मार्व्हल सिरीज पूर्ण झाली तेव्हा अनेकजण पाहण्यासाठी ते येत होते.
संपादन : प्रफुल्ल सुतार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.