heavy rain in belgaum 
कोल्हापूर

कापलेले भात गेले पाण्यात अन् शेतकरी अडकला संकटात 

मिलिंद देसाई

बेळगाव : यंदा बेळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला असतानाच परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. पावसाच्या तडाक्‍यामुळे भात, भुईमूग, नाचण्यासह भाजीपाला पिकांची मोठी हानी झाली आहे. आधीच लॉकडाउन आणि कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी हवालदिल बनला आहे.

सातत्याने पाऊस सुरु असल्यामुळे बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यात शेतातील कापणी केलेल्या भातपिकामध्ये पाणी साचून नुकसान झाले आहे. शिवारात पाणी साचल्याने भातपिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. मात्र भात पडल्याने पाणी जाण्यास बाहेर काढण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून जिल्ह्यात पडत असलेल्या पावसाचा खरिपाच्या सर्वच पिकांना फटका बसत आहे. पावसात भिजल्यामुळे भात काळे पडत असून उत्पादनातही घट होण्याची भिती व्यक्‍त केली जात आहे. अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतात साचलेल्या पाण्यात भुईमूग पीक भुईसपाट झाले आहे. 

जिल्ह्याच्या विविध भागांत चार दिवसांपासून परतीच्या पावसाचा दणका सुरुच आहे. जिल्ह्यात सर्वत्र कमी जास्त प्रमाणात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. 

सतत पडणाऱ्या पावसामुळे काढणीला आलेली खरीप पिके, भाजीपाला, फुलांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे भातकापणीही करता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावेळी मॉन्सूनला सुरुवात झाल्यानंतर काही दिवस पावसाचा जोर कमी होता. मात्र त्यानंतर सातत्याने पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मला विकत घेऊन दाखवा! पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं थेट भाजपला आव्हान; 7 खासदार फोडल्यानंतर आम आदमी पक्ष आक्रमक

कमळी- ऋषीचं लग्न ते भावनाच्या बाळाला धोका; 'तारिणी' ते 'सनई चौघडे' झी मराठीच्या टॉप १० मालिकांमध्ये काय घडणार?

Crime: बदलापुरात रिक्षाचालकाची गुंडागर्दी! वादानंतर तरुणावर शस्त्राने वार, गुन्हा दाखल

थप्पड प्रकरणातून हरभजन सिंगने कमावले कोट्यवधी रुपये, श्रीसंतचा मोठा दावा

Dhule Solapur Highway Accident : अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; 18 वर्षीय तरुणीला ट्रकनं चिरडलं, 250 फुटांपर्यंत नेलं फरफटत

SCROLL FOR NEXT