heavy rain in kolhapur district
heavy rain in kolhapur district 
कोल्हापूर

...आणि जीव वाचविण्यासाठी धडपड सुरू झाली  

युवराज पाटील

कोल्हापूर - धडकी भरविणारे पाण्याचे लोट आणि मिनिटामिनटाला वाढणारी पाण्याची पातळी यामुळे शाहूपूरीतील गल्लीबोळात काल रात्र भितीचे वातावरण निर्माण झाले. जयंती नाल्याचे पाणी बाहेर पडल्याने पंधरा मिनिटात बेसमेंट ओव्हरफुल्ल झाली. प्रापंचिक आणि व्यावसायिक साहित्य वाचविण्यासाठी काल रात्र लोकांनी जागून काढली. आजचा दिवस पाणी काढण्यात आणि साफसफाईसाठी खर्ची पडला. भिजलेले प्रिटींग मशीन, रावटर आणि साहित्य वाचविण्यासाठी धडपड सुरू होती. 

पंचमुखी गणेश मंदिराच्या मागे असलेली घिसाड गल्लीत असे विदारक चित्र होते. पाण्याची पातळी वाढू लागल्यानंतर काल रात्रीच येथे गलका उडाला. हाताला लागेल ते साहित्य बाहेर काढण्यासाठी धावपळ उडाली. पाण्याची पातळी डोळ्यादेखत वाढत गेली. पाऊस कोणत्या टोकाला पोहचेल याचा नेम नव्हता. व्यवसायाचे साहित्य भिजू दे पण जीव तरी वाचवूया यासाठी मध्यरात्रीपर्यंत धडपड सुरू होती. रात्री डोळ्याला डोळा लागतो न लोगतो तोपर्यंत सकाळ उजाडली. घर तसेच दुकानातील भिजलेले साहित्य पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी उभे राहण्याची वेळ आली. गेल्या वर्षीच्या महापूरातून शाहूपूरीवासिय तसेच कुंभार बांधव अद्याप सावरलेले नाहीत. ऑगस्टमधील पावसाने पुन्हा पाणी आले. पूराच्या पाण्याच्या लोकांना सवय आहे मात्र काल रात्री ज्या पद्धतीने पाणी घुसले त्याची चर्चा आजही सुरू होते. पाणी अचानक वाढलेच कसे असा प्रत्येकासमोर प्रश्‍न होता. परिसरात प्रिटींग, मोटर रिवायडींग, रावटरचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. दुकानात पाणी घुसले तरी लाखो रूपयांच्या मशिनरी खराब होण्याची भिती असते. नेमकी हिच स्थिती काल रात्रीच्या पावसामुळे झालेल्या पाण्याने केली. आसपासच्या गल्लीबोळात चार ते पाच फूटापर्यंत पाणी शिरले. मध्यरात्री पाणी ओसरले पण हेच पाणी आज सकाळी आठवणी मात्र कायम ठेऊन गेले. सकाळचा चहा नाही. नाश्‍ता नाही की दुपारच्या भोजनाच्या तयारी. नेमके नुकसान किती झाले याची चिंता. पाण्याच्या टॅंकरच्या माध्यमातून फवारा मारून साफसफाईचे काम सुरू होते. चिखलाचा सडा पडला होता. त्यामुळे एका टॅंकरने स्वच्छ होणे शक्‍य नव्हते. त्यामुळे खासगी टॅंकर घेण्याची वेळ आली. बेसमेंटमधील पाणी काढण्यासाठी पंप लावण्यात आला. जे साहित्य वाचले ते कोरडे करून काल रात्री जे झाले ते विसरून पुन्हा कामाला लागण्याची तयारी सुरू झाली. 
 
जयंती नाल्याच्या बाजूने दरवर्षी साफसफाई होते खरी पण गाळ, प्लॅस्टिक पिशव्या. कचरा निघतो त्याची उचल महापालिका प्रशासनाकडून होत नाही. आयुक्तांनी यासबंधी कल्पना दिली होती. काल रात्रीच्या पावसाने परिसरात हाहाकार माजविला. ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. 
-प्रकाश नाईकनवरे, माजी नगरसेवक 

काल रात्री पाऊस धडकी भरविणारा होता. घिसाड गल्लीत दरवर्षी पाणी येते. कितीवेळा पाणी येणार आणि त्यामुळे नुकसान किती सहन करायचे असाच प्रश्‍न पडला आहे. भराव टाकल्याने पूर्वीप्रमाणे पाण्याला वाट मिळत नाही. अचानक पावसाचे पाणी वाढले की नाल्यातून पाणी नागरी वस्तीत येते. लोक आपल्या परीने सावरण्याचा प्रयत्न करतात. मात्र सर्वच घटकांनी ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. 
 - प्रणव समर्थ


संपादन - धनाजी सुर्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT