heavy rain with wind in kolhapur city area today after four pm 
कोल्हापूर

कोल्हापुरात मेघगर्जनेसह पाऊस ; अनेकांची उडाली धांदल

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : ऑक्टोबर हीटचा तडाखा दुपारी बसत असतानाच सायंकाळी चारच्या सुमारास कोल्हापुरात सोसाट्याचा वारा आणि वादळी पाऊस सुरु झाला. पहाटे चारच्या सुमारास झालेल्या तुरळक सरी वगळता वगळता दुपारी आक्टोबर हिट जाणवत होती. मात्र चारच्या सुमारास मेघगर्जनेसह कोल्हापूर शहरात पाऊस सुरु झाला झाला. 

सोसाट्याच्या वाऱ्याने सुरुवात होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी आल्याने अनेकांची धांदल उडाली. वाऱ्याचा प्रचंड वेगासोबत पावसाच्या जोरात सरीही होत्या. अवघ्या पंधरा-वीस मिनिटांत झालेल्या वातावरणातील या बदलाने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना थांबायचे कोठे असा प्रश्न निर्माण झाला होता. अवघ्या दहा पंधरा मिनिटांत सर्वत्र पाऊस आणि पाणी झाले.

उन्हाचा तडाखा असल्यामुळे आणि त्यांच्याकडे छत्र्या रेनकोट ही नसल्याने त्यांना भेटेल त्या आडोशाला थांबावे लागत होते. पावसाच्या सरी सुरू झाल्यानंतर संपूर्ण शहरात अंधार झालेले रस्ते दिसत होते. अनेक वाहनांना त्यांचे इंडिकेटर आणि दिवे लावून जावे लागत होते. उपनगर भागातील शिवाजी विद्यापीठ परिसर, वर्षा नगर, राजेंद्रनगर परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

Satish Jarkiholi ED Raid : ED च्या धाडीत सापडले 2 कोटी! कारवाईनंतर बांधकाममंत्री म्हणाले, 'आमच्या संस्थांची वार्षिक उलाढाल दोन हजार कोटींची..'

बापरे! अमीषा पटेलच्या आईच्या घरातून डायमंड डायमंडचे दागिने चोरीला; घरातील हाऊस हेल्पला अटक

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Kolhapur Farmer Loan Waiver Second List : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर! जिल्ह्यातील 3,833 शेतकऱ्यांना दिलासा; तुमचे नाव आहे का?

SCROLL FOR NEXT