helicopter crashed machine malfunctioned and suddenly landed on the school playground kolhapur marathi news 
कोल्हापूर

आकाशात घिरट्या घालणारे हेलिकॉप्टर अचानक आले शाळेच्या पटांगणावर अन्

कुंडलिक पाटील

कुडित्रे (कोल्हापूर)  : पुण्याहून गारगोटी ला जाणाऱ्या एका खाजगी हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आकाशात घिरट्या घालणारे हेलिकॉप्टर अचानक शाळेच्या पटांगणावर उतरले. सुदैवाने प्रार्थना सुरू नव्हती,आणि  विद्यार्थी पटांगणावर नव्हते, यंत्रात बिघाड झालेले हेलिकॉप्टर कोसळले नाही, आणि अपघात टळला, यावेळी विद्यार्थी व ग्रामस्थांची एकच गर्दी झाली होती.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, 

साडेदहा वाजता कुंभी कारखाना परिसरात आकाशात एक हेलिकॉप्टर घिरट्या घालत होते.अचानक हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे , हेलिकॉप्टर खाली महाविद्यालयाच्या पटांगणावर उतरवले.कोरोना असल्यामुळे अकरा वाजता होणारी प्रार्थना बंद करण्यात आली होती, त्यामुळे पटांगणावर विद्यार्थी नव्हते. यामुळेही अनर्थ टळला आहे.

 बिघाड झालेले हेलिकॉप्टर अचानक घाईगडबडीने कोणतीही पूर्वसूचना न देता महाविद्यालयाच्या पटांगणावर उतरले. यावेळी परिसरात हेलिकॉप्टर  कोसळल्याची अफवा पसरली आणि नागरिकांनी धाव घेतली. यावेळी विद्यार्थी व नागरिकांची एकच गर्दी झाली.यावेळी महाविद्यालयाचे शिक्षकांनी पायलटशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.जमलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी वर्गात बसण्याची सूचना दिल्या.

तब्बल दोन अडीच तासानंतर बारा वाजता पोलीस आले, आणि यावेळी पायलट वेणू माधव यांनी सांगितले पुण्याहून एरो ट्रान्स या खाजगी कंपनीचे हेलिकॉप्टर सेन्सरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने  हेलिकॉप्टर अचानक खाली उतरवण्यात आले.पायलट सह सहा आसनी हेलिकॉप्टर आहे.हेलिकॉप्टर मध्ये  पायलट व एक तांत्रिक व्यक्ती होता.हे हेलिकॉप्टर पुणे येथून आले होते, गारगोटी येथून पॅसेंजर घेऊन मुंबई ला जाणार होते.घडलेल्या घटनेची माहिती पुण्यात कंपनीला कळविण्यात आली, कंपनीच्यावतीने हेलिकॉप्टर दुरुस्तीसाठी प्रतिनिधी येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : हातात पिस्तूल घेऊन ‘किंग ऑफ शिरूर’ची रील व्हायरल; दहशत निर्माण करणाऱ्या प्रकारावर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई कधी?

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT