with help of CCTV camera 10 robbery found police in kolhapur area 
कोल्हापूर

कोल्हापुरात सीसीटीव्हीमुळे गुन्हे होताहेत उघड

संजय दाभाडे

कळंबा : कळंबा, पाचगाव, मोरेवाडीसह उपनगरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे चोरीचे दहा गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. त्यामध्ये रोख रक्कम, सोन्या-चांदीचा ऐवज, वाहने असा ३५ लाख रुपये पेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आठ संशयित गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळून त्यांना अटक केली आहे. 

कळंबा, पाचगाव, मोरेवाडीसह लगतच्या उपनगरांचा कार्यभार करवीर पोलिस ठाण्याकडे आहे. या भागात चोरी, घरफोडी, खून, मारामारी, चेनस्नॅचिंग, वाहनचोरी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान यासह अनेक प्रकारचे गंभीर प्रसंग वारंवार घडतात. त्यामुळे गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी पोलिसांची दमछाक होत असून, संशयिताच्या तपासासाठी अडथळा निर्माण होत आहे. म्हणून पोलिस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून येथील परिसरामध्ये १४७ कॅमेरे बसवले आहेत.

पाचगाव येथील पंचशील कॉलनीमध्ये सुसज्ज सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष उभारला आहे. त्यामध्ये मोठ्या एलईडी स्क्रीन बसवल्या आहेत. त्याचबरोबर सीसीटीव्हीचे फुटेज पाहण्यासाठी करवीर पोलिस ठाण्याचे सात कर्मचारी व बिनतारी संदेश यंत्रणा तैनात  आहे. दोन ऑगस्टपासून ही यंत्रणा कार्यरत झाली असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे आठ महिन्यात चोरीचे दहा गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यामध्ये करवीर पोलिसांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

त्याचबरोबर चोरीतील संशयित गुन्हेगारांच्या तपासासाठी वेळोवेळी नाका-बंदी, रेकॉर्डवरील जुने गुन्हेगार शोधणे, गोपनीय माहिती यासाठी सीसीटीव्ही फुटेज यांचा आधार घेतला आहे. त्यामुळे तपासाची चक्रे गतीने फिरत आहेत. दरम्यान, विविध गुन्ह्यांतील संशयिताच्या तपासासाठी व महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी करवीर, गोकुळ शिरगाव, लक्ष्मीपुरी, इस्पुर्ली या चार पोलिस ठाण्याकडून या नियंत्रण कक्षाकडे अभिप्राय पाठवला जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपास कामातील पाचगावमधील सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष महत्त्वाचा दुवा
ठरत आहे.

"दक्षिणेत ग्रामीण भागासह उपनगराचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असून, लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येथील कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी व येथील नागरिकांना सुरक्षा कवच मिळावे, यासाठी नवीन पोलिस ठाणे स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच आणखी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे."

- सतेज पाटील, गृहराज्यमंत्री

कळंब्यातील चोरट्याला अटक

कळंबा येथील निखिल खडके याने फसवणूक करून मोरेवाडी आर. के. नगर येथील एका महिलेची घरातून पर्स पळवून नेली होती. त्यामध्ये रोख रकमेसह सोन्याचांदीचा ऐवज होता. पोलिसांनी अनेक महिने तपास करूनही खडके सापडत नव्हता. म्हणून करवीर पोलिसांनी पाचगाव येथील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे सहकार्य घेऊन फुटेजद्वारे खडके याला अटक केली. तसेच चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT