कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत उच्चांकी वाढ.....किती ते वाचा

शिवाजी यादव

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी उच्चांकी वाढ झाली. दिवसभरात तब्बल 793 जणांचे स्वॅब अहवाल पाॅझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या नऊ हजार 653 इतकी झाली आहे. दिवसभरात 14 बाधितांचे मृत्यू झाले. दिवसभरात 183 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. आजवर एकूण तीन हजार 951 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. एकूण पाच हजार 453 बाधितांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

उपचार घेणाऱ्या बाधितात 40 व्यक्तींची प्रकृती गंभीर आहे. जिल्ह्यातील सहा शासकीय रुग्णालयात झालेल्या आरोग्य तपासणीत एक हजार 10 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत. त्याचे अहवाल दोन दिवसांत मिळणार आहेत. बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बेडचा तुटवडा आहे. ग्रामीण भागात शासकीय रुग्णालयातून जवळपास दोनशेहून अधिक जादा बेडवर रुग्णांना दाखल केले आहे. शुक्रवारी एका दिवसात गडहिंग्लज, इचलकरंजी, जयसिंगपूर, शाहूवाडी परिसरात खासगी रुग्णालयातील यंत्रणेची मदत घेण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातील सौम्य संपर्कातील रुग्णांना तेथेच उपचार सुविधा दिली आहे. प्रकृती गंभीर आहे, अशांना उपजिल्हा रुग्णालय तसेच कोल्हापूरच्या सीपीआरमध्ये दाखल केले आहे. 

जिल्ह्याचा अपडेट

  • एकूण कोरोनाग्रस्त --- 9 हजार 653 
  • एकूण कोरोनामुक्त---- 3 हजार 951 
  • आजअखेरचे मृत्यू --------------- 249 
  • सध्या उपचार घेणारे ---- 5 हजार 453 


शेंडापार्क लॅबचे निर्जंतुकीकरण 
शेंडापार्क येथील सूक्ष्मजीवशास्त्रविभागाच्या प्रयोगशाळेतून शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत एकही स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला नाही तर गेल्या दोन दिवसात संकलित झालेले व तपासणीसाठी प्रलंबित असणारे स्वॅब पुणे, कऱ्हाड येथे शासकीय प्रयोगशाळांकडे पाठवण्यात आले आहेत. या शिवाय काही स्वॅब जिल्ह्यातील तीन खासगी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. बाहेरच्या प्रयोगशाळांकडून आज दिवसभरात स्वॅबचे अहवाल आले. दरम्यान, शेंडा पार्कातील प्रयोगशाळेतील निर्जंतुकीकरणासाठी स्वॅब तपासणीसाठी बंद ठेवले असल्याची माहिती वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. 


मध्यरात्रीत बाधितांच्या संख्येत वाढ 
गेल्या तीन दिवसात शेंडापार्क येथे स्वॅब तपासणी थांबली होती तर  दुसरीकडे जिल्ह्यातील 14 कोविड सेंटरवरून स्वॅब घेण्याचे काम सुरूच होते. अश्‍या प्रलंबित स्वॅबची संख्या वाढली आहे. त्याची तपासणी खासगी लॅबकडे देण्यात आली. यातील एका खासगी प्रयोगशाळेतून रात्री सव्वाबाराला 353 कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आले. यामुळे दिवसात एकूण बाधितांची संख्या उच्चांकी झाली आहे. 

संपादन ः विजय वेदपाठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Voting LIVE Updates : पुण्यातील प्रभाग क्रमांक 25 ड मध्ये राष्ट्रवादीचे बटन दाबल्यानंतर मतदान होत नसल्याचा आरोप

Prakash Ambedkar Prediction: महापालिका निवडणुकीचं मतदान संपण्याआधीच प्रकाश आंबेडकरांचं निकालाबाबत मोठं भाकीत, म्हणाले..

५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राच्या महिलांचे २७ वे तर रेल्वेचे १३ वे अजिंक्यपदक; पुरुषांमध्ये महाराष्ट्राला रौप्यपदक

EC Press Conference: मार्करवरून गोंधळ! शाई पुसरली जात नाही; निवडणूक आयोगाचा ठाम नकार, सांगितलं- फेक नरेटिव्ह...

Mohammed Siraj झाला कर्णधार, दोन सामन्यांमध्ये करणार संघाचे नेतृत्व; कोणत्या प्रतिस्पर्धींविरुद्ध डावपेच आखणार?

SCROLL FOR NEXT