Highway police seized Goa made liquor kolhapur crime news 
कोल्हापूर

महाराष्ट्रात बंदी असलेल्या गोवा बनावटीच्या  दारूचे अठरा बॉक्स पकडले ; दोघे ताब्यात

महादेव वाघमोडे

उजळाईवाडी (कोल्हापूर)  : महामार्ग पोलिसांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास  महाराष्ट्रात बंदी असलेल्या गोवा बनावटीच्या  दारूचे अठरा बॉक्स वाहतूक करणारी गाडी पकडली. 

 याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की . 

स. फौ. शंकर कोळी  तात्यासाहेब मुंडे  व त्यांचे सहकारी हे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करीत असताना पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र.  ४ वर  कागल दिशेकडून येणारी व पुण्याच्या दिशेने जाणारी एक सिल्व्हर रंगाची कार जिच्या काचा काळ्‍या रंगाच्या व बंद होत्या. कार चालकाल  संशयावरून  गाडी थांबविण्याचा इशारा केला परंतु  चालक  पळून जाण्याच्या तयारीत असताना गाडीतील दोन जणांना शिताफीने पकडण्यात पोलिसांना यश आले .

गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये विदेशी ब्रँड असलेल्या गोव्या बनावटीच्या महागड्या दारूचे १८ बॉक्स व सॅम्पल च्या काचेच्या बाटल्या अशा साठ हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू सापडली. कार मधील चालक प्रथमेश प्रभाकर रावळ वय २७ रा. मोरे ओडस ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग व त्याचा सहकारी लक्ष्मण विठ्ठल पाटकर वय २६ (रा.न्यू खासअसकल वाडी समाज मंदिर ,सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग )आशा दोघांना ताब्यात घेतले असून  गाडीसह  १२०१२० रुपये किमतीचा मुद्देमाल  जप्त करण्यात आला असून पुढील तपासासाठी आरोपी व मुद्देमाल गोकुळ शिरगाव पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत.

ही कारवाई  पो. स.इ.शिरगुप्पी यांच्या मार्गदर्शनाखाली केली यामध्ये स. फौ. कोळी पो. ह. तात्यासाहेब मुंडे पो. हे. कॉ. शहाजी पाटील, संदीप पाटील ,योगेश कारंडे ,पो.कॉ. तौफिक मुल्ला व आशिष कोळेकर यांनी सहभाग घेतला.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT