Hirashree Lake City Society has decided to take responsibility treatment at home on corona affected 
कोल्हापूर

कोल्हापुरातील 'या' सोसायटीत बाधित आढळलाच तर त्याच्यावर घरीच संपूर्ण उपचाराची जबाबदारी...

सदानंद पाटील

कोल्हापूर - शहरातील एका हॉस्पिटलवर कोरोनाबाधित रुग्णावर उपचार केले म्हणून दगडफेक झाली. कोरोनाग्रस्तांना व त्यांच्या कुटुंबीयांना गल्लीत आणि गावात वाळीत टाकल्याचे नामुष्कीजनक प्रकार पुढे येत आहेत. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर रंकाळा परिसरातील हिराश्री लेक सिटी सोसायटीने पुढचे पाऊल टाकत येथे बाधित आढळलाच तर त्याच्यावर घरीच संपूर्ण उपचाराची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान, सोसायटीच्या संचालकांसह फ्लॅटधारकांची याबाबत नुकतीच बैठक झाली असून कोरोनाबाधित आढळलाच तर संबंधित व्यक्‍तीसह कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय घेतला. काही सभासद फ्लॅटधारकांनी स्वत:चा फ्लॅट देण्याची तयारी दर्शवली तर काहींनी दैनंदिन गरजा भागवण्याची तयारी दर्शवत पुरोगामित्व सिद्ध केले. फक्त या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या परवानगीची आवश्‍यकता महत्त्वाची ठरणार आहे.जिल्ह्यात व शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या भल्याभल्यांना धडकी भरवत आहे. 

शहरातील असा एकही भाग शिल्लक राहिलेला नाही, जिथे कोरोनाचा रुग्ण नाही. त्यामुळे आपणापर्यंत कोरोना पोचणारच नाही, अशी परिस्थिती आता राहिली नाही. स्वत:च्या चुकीमुळे असेल किंवा दुसऱ्याच्या, कोरोना आपल्यापर्यंत पोहचू शकतो, याची जाणीव सर्वांनाच झाली आहे. त्यामुळे जरी कोरोना आपल्या सोसायटीत आला तरी घाबरायचे काही कारण नाही, असा संदेश हिराश्री लेक सिटीने दिला आहे. सुमारे पाचशे ते सहाशे लोकसंख्या असलेल्या या सोसायटीने कोरोनाविरोधात नेटाने लढण्याचा निर्धार केला आहे. सोसायटीत सरकारी अधिकारी, उद्योजक, डॉक्‍टर, बॅंकर, बिल्डर, शिक्षक असे सर्व उद्योग, व्यवसायातील सभासद आहेत. सर्व उपक्रमांत आणि सुखदु:खात सर्वांचा सहभाग असतो. सोसायटीतील डॉक्‍टरांच्या सल्ल्याने व महापालिकेच्या मदतीने नियोजनास सुरुवात केली आहे. 

यांनी केले नियोजन

सोसायटीतच कोरोनाच्या रुग्णावर उपचार करावेत, यासाठी चेअरमन युवराज पाटील, राजाराम भोसले, इंद्रजित जाधव-कसबेकर, एम. जी. पाटील, जयदीप पाटील, गिडाप्पा जाडी, शांताराम रेवणकर, पप्पू तोरस्कर, योगेश सपाटे, सतीश कबानी, दीपक पाटील, डॉ. अमोल लाहोटी, डॉ. दीपक घोलपे, प्रशांत तोरस्कर, ऋषीकेश गोडबोले यांनी नियोजन केले.

कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य यंत्रणेवर ताण आहे. उपचार करणारी रुग्णालये, बेड कमी पडू लागले आहेत. अशा काळात महापालिकेला सहकार्य व सामाजिक उत्तरदायित्व निभावण्याच्या भूमिकेनेच सोसायटीने हा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीत कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्याची सर्व सभासदांची मानसिकता आहे. 
- युवराज पाटील
चेअरमन, हिराश्री लेक सिटी

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीसाठी लागणार २४ हजार कर्मचारी

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Kannad News : हैदराबाद गँझेटीयरनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या; मुख्यमंत्री फडणवीसांकडे निवेदन देऊन केली मागणी

SCROLL FOR NEXT