home owner firing in belgaum 
कोल्हापूर

भाडेकरूंनी घर भाडे न दिल्याच्य रागातून मालकाने घरात जावून केला धक्कादायक प्रकार 

सकाळ वृत्तसेवा

चिकोडी (बेळगाव) : शहरातील बी. के. महाविद्यालयानजीक घरमालकाने गोळीबार करून भाडेकरूंना भीती घालून त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना काल, रविवारी (ता. १४) रात्री १० वाजता घडली.  

बी. के. महाविद्यालयानजीक घरमालक नूरअहमद शहापूर यांच्या घरात रोहिणी दीक्षित या आपल्या कुटुंबासोबत राहतात. घरमालक नूरअहमद शहापूर व भाडेकरू दीक्षित यांच्यात दोन महिने भाडे न दिल्याच्या कारणावरून वाद झाला. त्यातूनच आज घरमालक शहापूर यांनी दीक्षित यांच्या घरात जाऊन बंदुकीचा हवेत बार काढून दीक्षित कुटुंबियांना घाबरविण्याचा प्रयत्न केला. भाडेकरू असलेल्या रोहिणी दिक्षीत यांनी आरडाओरड करत, दहशत माजवत हवेत बार काढणाऱ्या घटनेचा व्हिडिओ चित्रित केला.

दरम्यान, या घटनेने चिक्कोडी शहरात खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत चिक्‍कोडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

भाडेकरू दीक्षित यांनी केलेल्या आरोपानुसार, लाॅकडाऊनमध्ये घरभाडे न भरल्यामुळे शहापूर यांनी डिपाॅझिटमधील दहा हजार रूपयांची आगाऊ रक्कम भाडे म्हणून कापून होती आणि उर्वरित २५०० रूपये घरभाडे द्यायचे होते. भाडेकरून शिल्लक भाडे देऊन नवीन घरात जाणार होते. परंतु, घरमालक पाणी न देणे, घराचा वीजपुरवठा बंद करणे, असे प्रकार करत होते. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादातूनच शहापूर यांनी गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा पोहोचली नाही. शहापूर यांनी झाडलेली गोळी घराच्या छतावर आदळली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT