Honeytraps attempt through social media 
कोल्हापूर

सोशल मिडियाद्वारे हनीट्रॅपचा प्रयत्न ; मैत्री वाढवून फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - सोशल मीडियाच्या माध्यमातून हनीट्रॅपचा फास टाकण्याचा प्रकार अलीकडे वाढला आहे. फेसबुक, व्हॉट्‌सऍपसह इन्स्ट्राग्रामच्या माध्यमातून मैत्री करून प्रेमाचे नाटक केले जात आहे. त्यासाठी तरुणांनी सतर्क होण्याची गरज आहे. हायप्रोफाईल हनीट्रॅप जाळ्यात आडकणे धोक्‍याचे ठरु शकते. 

अलीकडे बेळगाव व उत्तर कर्नाटकातील विविध भागातील युवकांना फेसबुकवर मुलींची प्रोफाईल असलेल्या फेसबुक अकौंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जात आहे. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताच मेसेंजरच्या माध्यमातून "हाय', "हाऊ आर यू फ्रेंड" किंवा गुड मॉर्निंग अशा स्वरुपाचे मेसेज येतात. स्वाभाविकपणे तरुण त्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतात. नेमके येथेच फसगत सुरु होते. "मुझसे दोस्ती करोगे'चे नाटक करत तरुणांना जाळ्यात ओढण्यास सुरु होते. पूर्ण नाव, पत्ता आणि प्रोफेशनची माहिती घेतल्यानंतर व्हॉट्‌स ऍप नंबर घेऊन त्याद्वारे चाटिंग सुरु केली जाते. त्यातून अश्‍लिल प्रकारासह फसविण्यात येत आहे. या स्वरुपाच्या जाळ्यात अलीकडे काही युवक पडून आर्थिक नुकसान करून घेतले आहे. मानहानीला घाबरून तक्रार केली जात नाही. हेच हेरून ब्लॅकमेलिंग वा पैसे उकळण्याचे धंदे सुरु आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि काहींनी याबाबत सांगितले की, फेसबुकवर सुंदर मुलींचे बनावट अकाऊंट तयार केली जातात. त्याद्वारे ज्या युवकाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची आहे, यात स्वतःची ओळख परिसरामधील आहे, असे भासविले जाते. सोशल मिडियाचे अनेक फायदे असले तरी तोटेही आहेत. त्यापैकी एक हा प्रकार पुढे आला आहे. यामुळे पालकांसह तरुणांनी काळजी घेण्याची गरज आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: २,४,६,४,४,१, ४! प्रियांश आर्यने ७ चेंडूंत राजस्थानला झोडले; जोफ्रा आर्चर कर्णधार रियानवर संतापला, नेमकं काय घडलं?

नायिका म्हणून गाजवलं दशक, आता ९ वर्षांनंतर पुन्हा मराठी सिनेमात! निशिगंधा वाड यांचं चित्रपटसृष्टीत कमबॅक

Latest Marathi News Live Update : सोलापूर जिल्ह्यातील भोंदूबाबा मनोहर भोसलेला दिलासा नाहीच; 2 मे'पर्यंत पोलिस कोठडीत वाढ

IMD Yellow Alert Maharashtra : विदर्भाला उष्णतेपासून दिलासा! उद्यापासून पूर्वमोसमी पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना Yellow Alert, मराठवाडा-पुण्यात काय स्थिती?

शैलजा ते शैलेश... राजश्री देशपांडेचा थक्क करणारा प्रवास! 'बाप्या' चित्रपटाचा ट्रेलर एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT