Kolhapur city Police esakal
कोल्हापूर

Kolhapur Police : 'या' कारणामुळं आता रात्री अकरानंतर शहर राहणार बंद; पोलिस प्रशासनाचा महत्वाचा निर्णय

रात्री अकरानंतर शहर बंद ठेवण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला

ओंकार धर्माधिकारी

वादावादीच्या घटना साधारणपणे बार, खाऊ गल्ल्या, काही रहदारीचे चौक, तालीम मंडळांचा परिसर येथे घडतात.

कोल्हापूर : शहरामध्ये (Kolhapur City) गुन्हेगारीच्या घटना दिवसाच्या तुलनेत रात्री अधिक घडतात. त्यामुळे रात्री अकरानंतर हॉटेल, बार, रेस्टॉरंट, हातगाड्या, खाऊ गल्ल्या बंद ठेवल्या तर रात्री होणाऱ्या गुन्ह्याच्या घटना कमी होतील, असा पोलिसांचा अंदाज आहे.

त्यामुळे रात्री अकरानंतर शहर बंद ठेवण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. याची अंमलबजावणी सुरू असून, अकरानंतर सुरू असणाऱ्या हॉटेल, बार यांच्यावर कारवाई केली जात आहे. पोलिस प्रशासनाने गुन्ह्यांचा आढावा घेतला असता काही तथ्ये समोर आली आहेत.

यामध्ये वादावादीच्या घटना साधारणपणे बार, खाऊ गल्ल्या, काही रहदारीचे चौक, तालीम मंडळांचा परिसर येथे घडतात. या वादावादीचे पर्यवसान मारामारीत होते. यामध्ये कधी कधी शस्त्रांचा वापर होतो. त्यातून गंभीर जखमी होण्याचा धोका असतो. काही वेळा खुनाच्या घटनाही घडल्याचे दिसते.

या मारामारीतील फिर्यादी आणि आरोपी हे बहुतांशी वेळा मद्यपान केलेले असतात. त्यातूनच पूर्ववैमनस्यातील वाद उफाळून येतात. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी रात्री अकरानंतर शहरातील बार, हॉटेल, रेस्टॉरंट, खाऊ गल्ल्या बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जाणारे सर्वसामान्य नागरिक हे रात्री अकराच्या आधीच जातात. त्यामुळे रात्री अकरानंतर सर्वसामान्य ग्राहकही फारसे नसतात. त्यामुळे पोलिसांनी हा उपाय चालू केला आहे.

गस्त वाढवण्याची आवश्यकता

शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसर, खासबाग मैदान, शिवाजी स्टेडियम, गांधी मैदान, रंकाळा तलाव व तेथील उद्यान यासह उपनगरांतही काही ठिकाणी गस्त वाढवण्याची आवश्यकता आहे. सायबर कॉलेज ते एस.एस.सी बोर्ड या ठिकाणी ओपन बार भरतो. येथे गस्त वाढवल्यास आळा बसू शकतो.

प्रवाशांची गैरसोय

शहरात रात्री अपरात्री परगावाहून पर्यटक येतात; पण रात्री अकरानंतर सर्व हॉटेल बंद असल्याने त्यांना जेवणाची समस्या भेडसावते. त्यामुळे पोलिसांच्या या नियमामुळे परगावाहून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. गणेशोत्सव, दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी रात्री अकरानंतर हॉटेल, बार, खाद्य पदार्थांचे स्टॉल बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT