How to spend daily ?; Contract staff at Shivaji University are not paid for two months 
कोल्हापूर

दैनंदिन खर्च करायचा कसा?; शिवाजी विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दोन महिने नाही पगार 

सुनील पाटील

कोल्हापूर : शासनाने लॉकडाऊन दरम्यान कोणत्याही कर्मचाऱ्यांचे पगार थकीत ठेवू नका, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, शिवाजी विद्यापीठातील सुमारे पाचशे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एप्रिल आणि मे महिन्याचा पगार अद्याप दिलेले नाहीत. त्यामुळे या पगारावरच चरितार्थ चालविणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगाराविनाच काम करावे लागत असल्याचे चित्र आहे. महिन्याला आठ हजार ते नऊ हजार पगार असणाऱ्या विद्यापीठातील या कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत सुमारे 90 लाख रुपये पगार थकला आहे. आज मिळेल-उद्या मिळेल या आशेवरच कर्मचाऱ्यांचे डोळे पगाराकडे लागले आहेत. 

विद्यापीठातील विविध विभागामध्ये सुमारे 550 कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत. शिवाजी विद्यापीठाने नियुक्त केलेल्या या कर्मचाऱ्यांना पडेल ते काम करावे लागते. त्यांचे हे आताही सूरुच आहे. मात्र, एप्रिल व मे या दोन महिन्याचा पगारच मिळालेला नसल्याने दैनंदिन खर्च कसा करावा, हा मोठा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. विद्यापीठातील इतर कर्मचाऱ्यांना पगार दिला जात आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना मात्र आज-उद्या म्हणत तब्बल दोन महिने पगाराची वाट पहावी लागत आहे. ज्यांचे घर याच पगारावर चालते त्यांच्या घरच्यांकडून या पगाराबाबत वारंवार विचारना होते. याचे उत्तर या कर्मचाऱ्यांकडेही नाही. काम सोडावे तर दुसरीकडे नोकरी नाही आणि नोकरी करतो तिथे पगार मिळत नाही, अशा विचित्र परिस्थितीतून या कर्मचाऱ्यांना दिवस काढावे लागत आहेत. काही प्रत्येक महिन्याला काही कंत्राटी कर्मचाऱ्यांचा करार संपतो; पण यांनाही या दोन महिन्यांचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून तत्काळ दखल घेवून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार देवून त्यांना हक्काचे आर्थिक पाठबळ दिले पाहिजे. 

शिवाजी विद्यापीठात सध्या कंत्राटी कर्मचारी नाहीत. जे आहेत आणि ज्यांचे पगार थकले आहेत. त्याच्यावर व्यवस्थापन परिषदेची समिती निर्णय घेणार आहे. 
 डॉ. विलास नांदवडेकर, कुलसचिव, 
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT