summer camp.jpg
summer camp.jpg 
कोल्हापूर

मनपा शाळांतील मुलांच्या समर कॅम्पला अशी झाली सुरवात !

संभाजी गंडमाळे

मध्यंतरीच्या काळात इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या गराड्यात कोल्हापूर महापालिकेच्या शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला; मात्र त्यावर मात करीत "मनपा' शाळांतील विद्यार्थ्यांनी नेहमीच आपलं टॅलेंट सिद्ध केले. प्राथमिक शिक्षण मंडळानेही विविध उपक्रमांवर भर दिला आणि त्यातून या शाळांतील मुलांसाठी "समर कॅम्प'ची अनोखी संकल्पना पुढे आली. 2013 मध्ये पहिला समर कॅम्प झाला आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अपवाद वगळता प्रत्येक वर्षी आता हा उपक्रम न चुकता होतो आणि त्यातही प्रत्येक वर्षी नव्याने काही बदल आवर्जुन केले जातात. 
मुळात महापालिका शाळेतील मुलांमध्ये बहुतांश मुले ही अतिशय सामान्य कुटुंबातली. साहजिकच त्यांना समर कॅम्प लांबच. साध्या इतर दुसऱ्या कुठल्या क्‍लासलाही जाण्याची त्यांना संधी कधी मिळत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही समर कॅम्पचा अनुभव मिळाला पाहिजे, या उद्देशाने महापालिकेत हा विषय अजेंड्यावर आला आणि त्याला लगेचच मंजुरीही मिळाली. 
महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे तत्कालीन सदस्य महेश जाधव यांनी समर कॅम्पची संकल्पना मांडली आणि सभागृहानेही ती उचलून धरली. महापालिकेच्या सर्व शाळांना याबाबतची माहितीपत्रके पाठवल्यानंतर प्रत्येक शाळांनी पंचवीस ते तीस विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती महापालिकेला पाठवली; पण पहिलेच वर्ष असल्याने प्रत्येक शाळेतील दोनच मुलांना कॅम्पमध्ये सहभागी करून घेण्यात आले. 
सोनतळी येथील स्काऊट बंगला परिसरात 27 एप्रिल ते एक मे 2013 या काळात पहिला समर कॅम्प झाला. त्यात महापालिकेच्या 64 शाळांतील निवडक दीडशे विद्यार्थी आणि तीस शिक्षकांचा सहभाग होता. अर्थात पहिलाच प्रयत्न असल्याने सहभागींची संख्या कमी ठेवण्यात आली. 
दररोज पहाटे साडेपाचला कॅम्पला प्रारंभ व्हायचा. दिवसभर व्यायाम, योगासनापासून ते बौद्धिक विकास, चित्रकला, हस्तकला, लेझीम, झांजपथक, ऍरोबिक्‍स, गायन, नृत्य अशा विविध कलांसह मुलांनी विविध खेळही यानिमित्ताने आत्मसात केले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कॅम्पसाठी मुलांना एकही दमडी खर्च करावी लागत नाही. लोकसहभागातून हा उपक्रम सुरू झाला आणि पुढे तो अधिक व्यापक झाला. 
महेश जाधव सांगतात, ""राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून पुढे राजकारणात आलो. त्यामुळे शिबिरांचा अनुभव होता. महापालिका मुलांसाठी अशा पद्धतीच्या शिबिरांची संकल्पना सभागृहात मांडताच त्याला सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. लोकसहभागातून हा उपक्रम राबवला. विशेष म्हणजे महापालिकेतील अधिकाऱ्यांनीही या उपक्रमासाठी आर्थिक योगदान दिले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिल्या शिबिराला प्रारंभ झाला होता. सकाळी सहापासून ते रात्री दहापर्यंत मुलांसाठीही हे निवासी शिबिर घेतले गेले. त्यानंतरही हा उपक्रम शिक्षण मंडळाने सुरूच ठेवला आहे.'' 

संपादन - यशवंत केसरकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT