husband killed Health worker in kolhapur shahuwadi 
कोल्हापूर

धक्कादायक ; आरोग्य सेविकेचा पतीकडून गळा आवळून खून 

सकाळ वृत्तसेवा

बांबवडे (कोल्हापूर) - सध्या कोरोनाच्या महाभयानक महामारीत आरोग्या सेविका स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. परंतु, यातीलच एका आरोग्य सेविकेचा गळा आवळून पतीने खून केल्याची घक्कादायक माहिती पुढे आली आहे. शैलेजा अरविंद पाटील असे खून झालेल्या आरोग्य सेविकेचे नाव आहे. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सावर्डे (ता. शाहूवाडी) येथील आरोग्य सेविका शैलेजा पाटील हिचा घरगुती वादातून पतीनेच दोरीने गळा आवळून खून केला. पतीने याबाबत पोलिसांत खूनाची कबुली दिली आहे.

मूळच्या पन्हाळा तालुक्यातील माले येथील आणि सध्या शाहूवाडी तालुक्यातील माण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सावर्डे उपकेंद्रात  आरोग्यसेविका म्हणून शैलजा पाटील कार्यरत होत्या. काल (ता. २८) रात्री पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद सुरु झाला. वाद टोकाला गेल्यालंतर मध्यरात्री पतीने शैलजा हिचा दोरीने गळा आवळुन खून केला. त्यानंतर आज (ता. २९ )सकाळी पतीने शाहुवाडी पोलिसांत खुनाची कबुली दिली. 

दरम्यान, मलकापूर येथे ग्रामीण आरोग्य केंद्रात शवविच्छेन सुरु असून पुढील तपास शाहुवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षण प्रवीण चौगुले व सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख करत आहेत.

मुलं पोरकी

शैलजा पाटील यांना हर्ष ( १०)व राजवर्धन ( ६ ) असे दोन मुलगे आहेत. हर्ष चौथीत शिकत होता तर राजवर्धन यावर्षी पाहिलीत प्रवेश घेणार होता. पती अरवींद पाटील हा शाहूवाडी, मलकापूर व बांबवडे या ठिकाणीच्या आठवडा बाजारात लिंबू विक्रीचा व्यवसाय करतो. मृत शौलजाचे माहेर घोटखिंड तर सासर माले( ता. पन्हाळा ) आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake Cancer Medicines Racket : कॅन्सरच्या बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघड; ९० हून अधिक रुग्णालयांना पुरवठ्याचा संशय

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर शिवेंद्रसिंहराजेंचा मोठा दावा; ‘तोंडाला पाने पुसणारे नव्हे, न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार’

Kundan Sankhe Arrested : पालघर रिलीफ रुग्णालय राडा प्रकरण; निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुखासह आठ जणांची पोलिसांसमोर शरणागती, राहुल घरतसह 22 जणांना पोलिस कोठडी

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती आगमन मिरवणुकीला सुरुवात

लालबागचा राजाचं दर्शन घ्यायचंय? जाणून घ्या पूजा आणि आरतीची वेळ, पाहा LIVE VIDEO

SCROLL FOR NEXT