Ichalkaranji Crime esakal
कोल्हापूर

दारुच्या नशेत पतीने पत्नीला अमानुष मारहाण करत गळा दाबून केला खून; पती पसार, कुलूपबंद खोलीत विद्रूप अवस्थेत मृतदेह

किसन गोसावी हा पत्नी करिष्माबरोबर तीन लहान मुलांसह सासरवाडीत राहत होता.

सकाळ डिजिटल टीम

करिष्मा यांचा थांगपत्ता लागत नसल्याने शोध घेतला असता भाड्याच्या कुलूपबंद खोलीत तिचा मृतदेह विद्रूप अवस्थेत मिळाला.

इचलकरंजी : नशेत वारंवार भांडणाऱ्या पतीने पत्नीला अमानुष मारहाण करत गळा दाबून खून (Murder Case) केल्याची धक्कादायक घटना घडली. करिष्मा किसन गोसावी ( रा. गोसावी गल्ली) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पती किसन गोसावी (मूळ रा. म्हैशाळ ता. मिरज) हा पसार झाला आहे. करिष्मा यांचा थांगपत्ता लागत नसल्याने शोध घेतला असता भाड्याच्या कुलूपबंद खोलीत तिचा मृतदेह विद्रूप अवस्थेत मिळाला.

किसन गोसावी हा पत्नी करिष्माबरोबर तीन लहान मुलांसह सासरवाडीत राहत होता. दोघांमध्ये वारंवार वाद होत. संग्राम चौक परिसरात एका घरात ते दोन महिन्यांपासून भाड्याने राहत होते. सोमवारी (ता.१७) दिवसभर सुरू त्यांचा वाद सुरू होता. दरम्यान, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास किसन याने पत्नीला बेदम मारहाण केली. भागातील नागरिकांनी मध्यस्थी करत भांडणे थांबवली.

काल सकाळी दोन्ही आठ वर्षांच्या मुलांना किसन याने सासरवाडीत नातेवाइकांकडे सोडले आणि पत्नी करिष्मा बाहेर गेली असून, मुलांना जेवण देण्यास सांगितले. त्यानंतर तो निघून गेला. मात्र, सायंकाळ झाली तरीही किसन आणि करिष्माही मुलांना घेण्यासाठी परतली नाहीत. काही काळ नातेवाइकांनी दोघांची वाट पाहिली. मात्र, नियमित वाद घालणाऱ्या किसनचा संशय आल्यानंतर करिष्माची शोधाशोध सुरू झाली. भाड्याच्या खोलीत पाहिले असता खोलीही कुलूपबंद होती.

अखेरीस रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नातेवाइकांनी भाड्याच्या खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घटनास्थळी शिवाजीनगर पोलिस दाखल झाले. पोलिस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी पाहणी केली. भागातील नागरिक, नातेवाइकांनी घराबाहेर मोठी गर्दी केली होती. किमान १२ तासांपूर्वी किसन याने पत्नी करिश्माचा खून करून खोलीत बंद केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. किसन गोसावी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, मिरज भागात त्याच्यावर चोरीची गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Burhanpur Violence : हनुमान चालीसा पठणावेळी दगडफेक; दोन समुदायांमध्ये तुफान हाणामारी, ७ जणांना अटक

चिखल पाहून कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसले खासदार, पूरग्रस्त भागाची केली पाहणी; VIDEO VIRAL

आयुषचा मृतदेह हत्येच्या ३ दिवसानंतरही ससूनमध्येच, अंत्यसंस्काराला इतका वेळ का?

Minister Jayakumar Gore: ‘उन्होंने खुद के गिरेबान में झाँकना चाहिये...’; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा धैर्यशील मोहिते-पाटलांना टोला

Punjab Floods : पंजाबमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात, लासलगावहून ४० टन कांदा रवाना; व्यापाऱ्यांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT