Marriage esakal
कोल्हापूर

Kolhapur Crime : लग्नात चांगला मानपान केला नाही म्हणून पतीनं पत्नीला ठार मारण्याची दिली धमकी

विवाहितेला तिच्या पतीने जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद इस्पुर्ली पोलिस (Ispurli Police) ठाण्यामध्ये नोंद झालीये.

सकाळ डिजिटल टीम

ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार प्राजक्ताने इस्पुर्ली पोलिस ठाण्यामध्ये दिली आहे.

नंदगाव : प्राजक्ता राहुल पाटील (वय २४) या विवाहितेला तिच्या पतीने जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद इस्पुर्ली पोलिस (Ispurli Police) ठाण्यामध्ये नोंद झाली आहे.

याविषयी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राहुल सिदराम पाटील (रा. म्हाकवे, ता. कागल) व त्याच्या घरचे पत्नी प्राजक्ता हिला काही महिन्यांपासून तू लग्नामध्ये चांगला मानपान केला नाहीस, माहेरून काहीच घेऊन आली नाहीस, तुला स्वयंपाक नीट करता येत नाही, असे म्हणून शारीरिक व मानसिक छळ करत होते.

२० ऑक्टोबर रोजी राहुल याने हातात तलवार घेऊन तिच्या माहेरी म्हाळुंगे (ता. करवीर) येथे दारात येऊन तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार प्राजक्ता हिने इस्पुर्ली पोलिस ठाण्यामध्ये दिली आहे. याबाबत राहुल व त्याच्या घरच्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून राहुलला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavish Aggarwal: ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्याविरुद्ध FIR दाखल; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने संपवलं जीवन

Viral Video : भारताचा पराभव होण्यापूर्वी विराट कोहलीने जे केलं ते... शुभमन गिल, श्रेयस अय्यरसोबतच्या कृतीची सोशल मीडियावर चर्चा

Winter Healthcare Tips: हिवाळ्यात उबदार आणि निरोगी राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स; घ्या त्वचा, केस आणि आरोग्याची काळजी

BR Shetty: एका रात्रीत नशिब बदललं; 880000000000 रुपयांची कंपनी फक्त 74 रुपयांना विकली; आता कोर्टाने ठोठावला 408 कोटींचा दंड

Diwali Sweets Alert: दिवाळीत खवा शुद्ध की भेसळयुक्त आहे कसा ओळखायचा? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT