chandrakant patil_rohit pawar
chandrakant patil_rohit pawar  
कोल्हापूर

वाटलं होतं चंद्रकांत पाटील उमेदवार असतील पण...; रोहित पवारांची कोल्हापुरात फटकेबाजी

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं चांगलाच जोर लावला आहे. दरम्यान आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे देखील कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी आयोजित युवा मेळाव्यात पवार यांनी भाजपवर चौफेर हल्लाबोल केला. "मला वाटलं होतं, भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील असतील" अशा शब्दांत यावेळी पवार यांनी पाटलांवर टीका केली. (I thought Chandrakant Patil would be from BJP candidate but Rohit Pawar speech in Kolhapur)

पवार म्हणाले, "इथलं राजकारण इतकं खालच्या पातळीवर जाईल अस वाटलं नव्हतं. एखाद्या मातेला, महिलेला इथं कमी लेखलं जातंय. तुम्ही एका महिलेबाबत बोलता तेव्हा तुमची सर्वच महिलांबाबत तीच भूमिका असते. भाजपाचे नेते महिलांबाबत जसा विचार करतात तो शाहूंची भूमी कदापी स्वीकारणार नाही. अंबाबाई मंदिरात घोटाळा करुन ज्यांनी मंदिरालाही सोडलं नाही ते काय विकास करणार. मला वाटलं होतं इथं भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील असतील पण तसं झालं नाही"

शाहू मिलच्या जागेवर शाहू महाराजांचं स्मारक व्हावं अशी महाविकास आघाडीचीही भूमिका आहे. त्यामुळे त्याठिकाणी शाहू स्मारक होणारच असा विश्वास यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केला. कोल्हापूरातील एमआयडीसीत आयटी पार्क व्हावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इथल्या मुलांना रोजगार मिळावा म्हणून सर्वजण प्रयत्न करत आहेत. भविष्याकडे आपण बघतो तेव्हा इतिहासही बघितला पाहिजे. कोल्हापूर देशाला विचार दिला आहे, हा विचार म्हणजे समतेचा, सर्वधर्म समभावाचा विचार आहे, अशा शब्दांत रोहित पवार यांनी युवा मेळाव्यात युवा नेत्यांना, कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT