कोल्हापूर

धोकादायक मिळकतीबाबत इचलकरंजी पालिका यंत्रणा सतर्क; प्रशासनाकडून सूचना

मिळकतींबाबत उपाययोजनेच्या प्रशासनाकडून सूचना

सकाळ डिजिटल टीम

इचलकरंजी : शहरातील धोकादायक मिळकतींबाबत पालिका प्रशासन आतापासून सतर्क झाले आहे. अशा धोकादायक मिळकतींबाबत पुढील उपाययोजना करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाकडून संबंधितांना दिल्या आहेत. संभाव्य वित्त व जिवीत हानी टाळण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही याबाबत कार्यवाही सुरु केली आहे.

दोन वर्षापूर्वी शहरात अतिवृष्टी आणि पंचगंगा नदीला महापूर आला होता. त्यामुळे गावभाग तसेच नदीकाठ परिसर पूरग्रस्त झाला होता. यावर्षीही संभाव्य पूरस्थिती लक्षात घेवून पालिका प्रशासन आतापासूनच सतर्क झाले आहे. यामध्ये धोकादायक मिळकतीबाबत आतापासूनच खबरदारी घेतली जाते. दरवर्षी याबाबत पालिका प्रशासनाकडून सर्व्हे केला जातो. यामध्ये धोकादायक स्थितीत असणार्‍या मिळकतींबाबत पुढील कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना सूचित केले जाते.

यापूर्वी धोकादायक मिळकतींची पडझड झाल्यांने मोठ्याप्रमाणात वित्त व जिवीत हानी झाली आहे. यंदाही हा धोका ओळखून पालिका प्रशासन आतापासून सकर्त झाले आहे. धोकादायक मिळकतींबाबत एक निवेदन जारी केले आहे. ज्या मिळकती अथवा त्यामधील एकादा भाग पडण्याचा धोका आहे, ज्याचा शेजारील जागेत आश्रय घेत असलेल्या नागरिकांना अथवा जवळून जाणार्‍या व्यक्तीला धोका पोहचवू शकतो, अशा मिळकती संबंधितांनी तातडीने पाडून टाकाव्यात अथवा त्याची योग्य ती दुरुस्ती करुन मजबूतीकरण करावे, अशी सूचना केली आहे.

पूरग्रस्त परिसरावर विशेष लक्ष

दोन वर्षापूर्वी शहरात महापूर आला होता. त्यामुळे शहरातील नदीकाठचा मोठा भाग महापूरच्या तडाख्यात सापडला होता. त्यामुळे अनेक मिळकती कमकुवत झाल्याची शक्यता आहे. पून्हा अशी परिस्थीती उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील संभाव्य जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे.

"धोकादायक मिळकतींबाबत पालिका प्रशासनाने केलेल्या सूचनेनुसार संबंधितांनी पुढील कार्यवाही करावी. अन्यथा यापासून कोणता धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी संबंधितांवर राहिल."

- प्रदीप ठेंगल, मुख्याधिकारी, इचलकरंजी नगरपरिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

"इंडस्ट्रीतून हाकलून द्यावं इतका मी बेशिस्त वागलो" आस्ताद काळेने उघड केली कठीण काळाची आठवण; म्हणाला..

Latest Marathi News Live Update: अशोक खरातला ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Strait of Hormuz: शेवटच्या क्षणी काय घडलं? पाकिस्तानमधील बैठक का फिस्कटली? इराणने सांगून टाकलं

पुण्यात PhD करणाऱ्या तरुणीनं संपवलं आयुष्य, प्राध्यापकाने २ दिवसांपूर्वी स्टॅम्पवर लिहून दिलेलं चूक झाली; चिठ्ठीत लिहिलं कारण

SCROLL FOR NEXT