murder news in ichalkaranji esakal
कोल्हापूर

Crime : इचलकरंजीत कामगाराच्या मुलाचा निर्घृण खून; धारधार शस्त्राने केले वार

याप्रकरणी एका सराईत गुन्हेगारासह दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ डिजिटल टीम

याप्रकरणी एका सराईत गुन्हेगारासह दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

इचलकरंजी : पूर्ववैमनस्यातून एका कामगाराच्या मुलाचा धारधार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. राहुल दयाळ (वय 22 ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असल्याचे समजते आहे. ही घटना आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास येथील तीन बत्ती चौकानजीक घडली. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगारासह दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. गणेशोत्सवाच्या धामधूमीत झालेल्या या खुनाने पोलिस सजग झाले आहेत. (murder news in ichalkaranji)

मिळालेली माहिती अशी, राहुल दयाळ हा आपल्या कुटुंबियांसमवेत तीन बत्ती चौका नजीक राहत होता. त्याचा काही दिवसांपूर्वी मित्रांबरोबर वाद झाला होता. या वादातूनच आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास काही मित्रांनी त्याच्यावर हल्ला चढवला. या वादात दोघांनी धारदार चाकू सारख्या शस्त्राने त्याच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात तो रक्तबंबाळ झाला. त्याला त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीचा त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती समजतात परिसरातील नातेवाईक मित्रमंडळानी रुग्णालयासमोर मोठी गर्दी केली. घटनास्थळी पोलिसही दाखल झाले. एका सराईत गुन्हेगारास संशयीतास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या धामधुमीत खून झाल्याने पोलिस दलात मात्र खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for ICC Women’s T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; सलामीला पाकिस्तानशी भिडणार, जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् संपूर्ण वेळापत्रक

Kanker IED Blast: छत्तीसगडमध्ये मोठा आयईडी स्फोट! ३ जवान शहीद तर १ जखमी, कशी घडली घटना?

14 व्या वर्षी लग्न, सासरी सहन केला नाहक त्रास, 450 सिनेमांमध्ये काम करुनही झाला दुर्देवी अंत, कोण होती अभिनेत्री?

Gulabjam City: जिभेवर ठेवताच विरघळणारा 'शाही' गोडवा! 'या' शहराला म्हणतात 'गुलाबजामची राजधानी'; ८५ वर्षांपासून जपलीये चव!

Latest Marathi News Live Update : नसरापूर हत्या प्रकरणावर सुप्रिया सुळे संतप्त; ‘फास्ट ट्रॅक कोर्ट, कठोर शिक्षा हवी’

SCROLL FOR NEXT