Ichalkaranji Crime
Ichalkaranji Crime sakal
कोल्हापूर

Ichalkaranji Crime: 'उसने घेतलेले पैसे दे, नाहीतर तुला जिवंत ठेवत नाही'; मित्रानेच मित्रावर केला खुनी हल्ला

सकाळ डिजिटल टीम

अमन यानं हातातील चाकूनं पाठीत व कपाळावर जबर वार करून धीरज याला गंभीर जखमी केले. हल्ला करून अमन पसार झाला.

इचलकरंजी : उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने एका यंत्रमाग कामगार मित्रानेच आपल्या यंत्रमाग कामगार मित्रावर खुनी हल्ला केला. चाकूने पाठीवर व कपाळावर सपासप वार करून धीरज लालबिहारी राम याला गंभीर जखमी केले.

त्याला उपचारांसाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात (Sangli Civil Hospital) दाखल केलं आहे. या प्रकरणी सौ. गुडियादेवी धीरज राम यांच्या फिर्यादीनुसार अमन बाणदार (रा. खोतवाडी) याच्यावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गुडियादेवी राम यांचे पती धीरज व संशयित अमन हे दोघे मित्र आहेत. दोघेही खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील महादेव देसाई यांच्या मालकीच्या यंत्रमाग कारखान्यात काम करतात.

धीरज यांनी अमन यांच्याकडून खर्चासाठी म्हणून दहा हजार रुपये हात उसने घेतले होते. त्यापैकी काही पैसे धीरज यांनी परत दिले होते.

उरलेल्या पैशासाठी अमन याने धीरज याच्याकडं तगादा लावला होता. धीरज यांनी उरलेले पैसे काही दिवसांनी देतो, असं सांगितले. मात्र, याचा राग अमन यांना होता.

दरम्यान, काल सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास यड्राव (ता. शिरोळ) येथील पार्वती गेट समोर दोघे भेटले आणि दोघांमध्ये वाद जुंपला. धीरज याला उरलेले पैसे दे नाहीतर तुला जिवंत ठेवत नाही, असं म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली.

अमन यानं हातातील चाकूनं पाठीत व कपाळावर जबर वार करून धीरज याला गंभीर जखमी केले. हल्ला करून अमन पसार झाला.

रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत धीरज रस्त्याच्या बाजूला पडला. त्याला उपचारासाठी इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल केलं. प्रकृती गंभीर बनल्यानं प्राथमिक उपचार करून पुढील उपचार करता सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT