In Ichalkaranji Fined 1730 People For Walking Around Without Masks Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

इचलकरंजीत विनामास्क फिरणाऱ्या 1730 जणांना दंड

पंडित कोंडेकर

इचलकरंजी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध साधनांचा वापर अनिवार्य आहे. त्यापैकी एक असलेल्या मास्क वापराबाबत अद्यापही काही नागरिकांत उदासिनता आहे. मास्कचा वापर अनिवार्य करण्यासाठी दंडात्मक कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार शहर वाहतूक शाखेने कारवाईची धडक मोहिम राबवली होती. यामध्ये गेल्या 21 दिवसांत 1730 जणांवर कारवाई केली आहे. यामध्ये 1 लाख 73 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा केली आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सींगचा वापर महत्वाचा आहे. प्रत्येक ठिकाणी याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासाकडून केले आहे. त्याचा सक्तीने वापर विविध आस्थापनाच्या ठिकाणी केला आहे. प्रशासन पातळीवरही याबाबत जनजागृती केली आहे. त्यामुळे बहुतांशी नागरीक याबाबत सजग झाले आहेत. प्रशासनाच्या सुचनांचे तंतोतंत पालन करण्यात येत असल्यामुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात होणारा संसर्ग टाळता आला आहे. 

मात्र अद्यापही काही नागरीक मास्क वापरण्याबाबत उदासीन आहेत. मास्क न वापरल्यामुळे संसर्ग वाढण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कारवाईचे आदेश दिले होते. पालिकेकडूनही याबाबत कारवाई केली होती. मात्र ही कारवाई प्रभावी झाली नाही. शिवाय मनुष्य बळ कमी असल्यामुळे कारवाई करताना अडचण होती. याबाबत शहर वाहतूक शाखेकडील पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी 15 सप्टेंबरपासून नगरपालिका क्षेत्रात कारवाईस सुरुवात केली आहे. प्रभावीपणे हे काम करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली. 

पाचवेळा 100 हून अधिक जणांवर कारवाई 
गेले 21 दिवस ही कारवाई सुरु आहे. यामध्ये पाचवेळा 100 हून अधिक नागरिकांवर कारवाई केली आहे. यामुळे नागरिक आता सक्तीने मास्क वापरण्याबाबत दक्ष राहत आहेत. त्यामुळे कारवाईची प्रमाण कमी होत आहे. 

रक्कम पालिकेच्या तिजोरीत 
मास्क वापराबाबत शहर वाहतूक शाखेने कारवाई केली असली तरी यातून जमा होणारी रक्कम पालिकेकडे जमा केली आहे. मास्क न वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून 100 रुपयांची दंडात्मक आकारणी केली आहे. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tobacco Excise Duty: सिगारेट आणि पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! नवा कर लागू होणार; पण कधीपासून? तारीख आली समोर

Education News : शिक्षक भरतीचा मोठा निर्णय! शिक्षण आयुक्त कार्यालयाचे अधिकार काढून परीक्षा परिषदेकडे सुपूर्द

बापरे! अर्जुननंतर अस्मितासमोर येणार सचिनच्या अफेअरचं सत्य; सासूबाईंसमोरच साक्षीला करतोय किस

महापालिका निवडणुकांआधी मोठा राजकीय बॉम्ब! ठाकरे बंधूंनंतर आता अजून एक भावांची जोडी एकत्र येणार? दलित मतांचे एकत्रीकरण होणार

New Year Calendar : एका वर्षांत का असतात 12 महिने? 11 किंवा 10 का नाही..'या' राजाच्या निर्णयाने बदललं जगाचं कॅलेंडर, थक्क करणारी माहिती

SCROLL FOR NEXT