इचलकरंजी - कोरोनाचा पुढील संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून 100 टक्के लॉक डाऊन पाळावा. यासाठी प्रशासनाच्य आवाहनानुसार 11 नियमांचे पालन करुन शहर कोरोनामुक्त होण्याचा संकल्प करुया, असे भावनिक आवाहन येथील पोलीस उप अधिक्षक गणेश बिरादार यांनी केले आहे. त्यांचे हे आवाहन सोशल मिडियातून आज दिवसभर व्हायरल झाले आहे.
राज्यातील एक दाट लोकवस्तीचे शहर असलेल्या इचलकरंजी मध्ये कोरोना बाबत अतिशय जागृत राहण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगली सेवा बजावली आहे आणि नागरिकांनीही चांगली साथ दिली आहे . महिनाभर प्रचंड मेहनत घेतली असतानाही एक रुग्ण सापडल्यानंतर श्री बिरादार यांनी इचलकरंजीच्या नागरिकांना सजग राहण्यासाठी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. श्री. बिरादार यांनी सोशल मिडियाव्दारे मांडलेली भूमिका अशी, गेली महिनाभर इचलकरंजीत सर्वच घटकांनी चांगली मेहनत घेतली होती. त्यामुळे लॉक आऊट होण्याची वेळ असतांना पून्हा लॉक डाऊन व्हावे लागत आहे. 95 टक्के नागरिक नियम पाळत आहेत. पण 5 टक्के नागरिकांनी गांभिर्याने न घेतल्यांने कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. चांगल्या बाबींकडे दुर्लक्ष करुन कांही नागरिक विनाकारण एकत्र येत आहेत. कोरोनांने आता वस्त्रनगरीत शिरकाव केला आहे. संपूर्ण शहर या विळख्यात जाण्यापूर्वी नागरिकांनी स्वतःवर कडक निर्बंध घालून घेण्याची वेळ आली आहे.
इचलकरंजी शहराची संस्कृती, परंपरा, जडणघडण ही खूप महान आहे. येथील भरभराटीला इतिहास आहे. अदृश्य विषाणूमुळे वस्त्रोद्योगाची घरघर थांबली. आपण शिस्तबध्दपणे लढा देत आहोत. विजय समीप असतांना शत्रू आपल्या गोटातील शिरकाव परतून लावण्याची वेळ आली आहे. त्यासाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार 11 नियमांचे पालक करुया. यामुळे बेरजेने वाढ होईल पण गुणाकार होऊ द्यायचा नाही, असा विश्वास श्री. बिरादार यांनी व्यक्त केला आहे.
वाचा - बरं झालं... इचलकरंजीतील त्या घरातील इतरांचा रिपोर्ट आला निगेटिव्ह...
नागरिकांसाठी केलेले आवाहन
एकमेकांचा संपर्क टाळा, अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडा, मॉर्निंग व इव्हनिंग वॉक पूर्णपणे बंद करा, मुलांना गल्लीत खेळायला सोडू नका, एकमेकांच्या घरी जाणे टाळा, वृध्दांची काळजी घ्या, दुसर्या झोनमध्ये नाहक जाऊ नका, बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तीची माहिती आयजीएम रुग्णालय अथवा पोलिसांना द्या, वेळोवेळी हात धुवा, मास्क व सॅनिटायझरचा वापर करा.
“ कोरोना वाढला तर कॉन्टेन्मेंट झोनमुळे शहरातील व्यवसाय सुरु होणार नाहीत. इचलकरंजी लवकरच सुस्थीतीत आणायची असेल तर जनता कर्फ्यू पुढील सहा दिवस कडक पाळावा.“
गणेश बिरादार, पोलीस उप - अधिक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.