Ichlkarnji textile industry collapse kolhapur marathi news
Ichlkarnji textile industry collapse kolhapur marathi news 
कोल्हापूर

Coronavirus Impact : वस्त्रोद्योग शटडाउनच्या दिशेने : कामगार चालले आपल्या घरला...

संजय खूळ

इचलकरंजी (कोल्हापूर) : शहराची आर्थिक चक्रे फिरविणाऱ्या येथील वस्त्रोद्योग व्यवसाय शटडाउन करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. 
शहरात आधुनिक यंत्रमागावर काम करणाऱ्या बिहार आणि उत्तर प्रदेशातील निम्म्याहून अधिक कामगार मूळ गावी परतले असून, साधे यंत्रमाग अनेक ठिकाणी उद्या (ता. २१)पासून बंद राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कोरोनाची साथ नियंत्रणात येईपर्यंत वस्त्रोद्योग व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्‍यता आहे.


संभाव्य धोका
* गारमेंटसह अनेक उद्योगात मोठ्या प्रमाणात एकत्रित कामगार
* परप्रांतीय कामगारांच्यात जागृकता कमी
* अनेक कामगार आणि कुटुंब दाटीवाटीने राहतात
* अशा ठिकाणी आजार गतीने पसरण्याचा धोका
* उद्योगाच्या निमित्ताने देशातील विविध भागातून नागरिकांची ये-जा
* गारमेंट उद्योगात मोठ्या प्रमाणात एकत्रित काम करणाऱ्या महिलांमुळे धोका अधिक

एक दिवस बंदमध्ये सहभागी

यंत्रमाग व्यवसायातील अनेक उद्योगांना फटका बसत आहे. येत्या रविवारी या व्यवसायातील सर्वजण एक दिवस बंदमध्ये सहभागी होणार आहेत. टप्प्याटप्प्यांनी शहरातील उद्योगांवरही मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे व्यवसाय बंद ठेवण्याची अनेकांची मानसिकता आहे.
- सतीश कोष्टी, अध्यक्ष, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन

शटडाउन का गरजेचे?
 वस्त्रोद्योगात तब्बल प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष एक लाख कामगार
 कामगारांचा सातत्याने एकमेकांशी संपर्क
 अनेक कामगारांत संभाव्य धोक्‍याबाबत जागरूकता कमी
 अशा ठिकाणाहून संसर्ग अधिक गतीने पसरण्याची भीती
 परप्रांताशी संपर्काने आजार या ठिकाणी येण्याची भीती

उद्योजकांची मानसिकता
 सद्यस्थितीत उद्योजकांची उत्पादनाची मानसिकता नाही
 उत्पादित माल कधी उचलला जाईल, याची शाश्‍वती नाही  पुढील बाजारपेठ कशी असेल, याबाबत अंदाज नाही 
 मोठी गुंतवणूक अडकून राहण्याची उद्योजकांची भीती

वस्त्रोद्योगाची सद्यस्थिती
 राज्यातील अन्य यंत्रमाग केंद्रात उद्योग बंद
 कापड प्रक्रिया करणाऱ्या अनेक उद्योगावर संकट
 वाहतूक करतानाही अनेक अडथळे
 सूत आणि कापसाचे दर अस्थिर
 एकत्रित काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी 
 उद्योगात कामगारांची संख्या रोडावू लागली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT