idea of ​​creation Catholic control device is based done to prevent air pollution research marathi news 
कोल्हापूर

 इनोव्हेशन  : हवेतील प्रदूषण रोखण्यास मदत होणार ‘कॅथॅलिक कंट्रोल’ बनवले सुमितने 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  मोटारींमुळे होणारे हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी कॅथॅलिक कंट्रोलचे यंत्र येथील सुमित संतोष पोवार याने बनविले आहे. हे यंत्र सायलेन्सर आणि इंजिनच्यामध्ये लावल्यास हवेत होणारे ४० टक्के प्रदूषण कमी होते, असा त्याचा दावा आहे. मुंबई आयआयटीने याला मान्यता दिली असून, यातून हवेचे प्रदूषण कमी होते हे मान्य केल्याचे सुमित सांगतो. सध्या ‘एआयआर’कडे त्याची चाचणी करण्यासाठी निधी नसल्याची नाराजी सुमितने व्यक्त केली. एआयआरकडून चाचणी यशस्वी झाल्यास अवघ्या दोन-अडीच महिन्यांत हे यंत्र प्रत्यक्षात वापरता येईल, असा विश्‍वास सुमितला आहे.

सुमितच्या वडिलांचे मोटार दुरुस्तीचे गॅरेज आहे. मोटारीचे गरम झालेले इंजिन थंड करण्यासाठी किंवा त्याचे तापमान कमी करण्यासाठी ज्या पद्धतीने ‘रेडिएटर’चा वापर होतो त्याच पद्धतीने हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी काय करता येईल, या विचारातून ‘कॅथॅलिक कंट्रोल’ यंत्र तयार करण्याची कल्पना त्याचे वडील संतोष यांना पंधरा वर्षांपूर्वी सुचली होती. त्यानंतर सुमितने यात पुढाकार घेत हे यंत्र प्रत्यक्षात आणले. 

मुंबईतील बेस्ट, कोल्हापूरची केएमटी यांसह रेल्वेच्या इंजिनला हे यंत्र बसविता येते. त्यामुळे हवेतील प्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे. काही ठिकाणी चाचणीही झाली आहे. मात्र केवळ ॲटोमिक रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआयआर)च्या मान्यतेनंतरच त्याचा वापर देशातील सर्वच वाहनांना करता येणार आहे. याचे पेटंटही घेतले आहे. गुरदेवसिंह व्होरा यांचेही सहकार्य लाभत आहे.

विद्यापीठात लॅब झाल्यास विद्यार्थ्यांना फायदा
यंत्रांची चाचणी करण्यासाठी कोल्हापूर परिसरात लॅब नाही. यासाठी ‘एआयआर’कडे जावे लागते. तेथे सुमारे पाच-सहा लाख रुपये खर्च होणार आहे. सध्या निधी नाही म्हणून चाचणी थांबली आहे.  हीच लॅब शिवाजी विद्यापीठात झाली तर अनेक अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची सोय होईल, खर्च कमी होईल, असे ही सुमितने सांगितले.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray Statue Vandalised : मीनाताईंच्या पुतळ्यावर रंगफेक; ठाकरेंची शिवसेना आक्रमक, मुंबईत तणाव वाढला

Pune News : अंगणवाड्यांची धोकादायक स्थिती; बालशिक्षण धोक्यात; दाटीवाटीत मुलांचे शिक्षण, सुरक्षिततेचा प्रश्न

Share Market मध्ये नुकसान झालं नाशिकच्या दोन पठ्ठ्यांनी असा मार्ग निवडला की पोलिसांनीही डोक्याला हात मारला; नेमकं काय घडलं?

Robbery At SBI Bank : स्टेट बँकेच्या शाखेवर पिस्तूल, चाकूने धमकावून दरोडा, आठ कोटींचा ऐवज लुटला, पोलीस घटनास्थळी दाखल

Navratri 2025 Do's and Don'ts: शारदीय नवरात्रात काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT