if action on swim in kolhapur Panchganga river 
कोल्हापूर

कोल्हापूर ; पंचगंगा नदीवर पोहायला जाताय! पोलिसांनी दिलाय कडक कारवाईचा इशारा 

संदीप पोवार

कसबा बावडा (कोल्हापूर) - प्रशासनाने कोल्हापूर शहरामध्ये दैनंदिन व्यवहार सुरू करण्यासाठी काही नियम लावले आहेत. पण या नियमामध्ये नदीवर पोहण्यासाठी बंदी असूनसुध्दा कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्यावजवळ सकाळी व दुपारच्या वेळेत पोहण्यासाठी दररोज गर्दी होत असते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा नियम धाब्यावर बसला आहे. ही बाब करवीर पोलिसांना कळताच पोलिसांनी राजाराम बंधाऱ्यावर जाऊन स्पीकरव्दारे पोहणाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे नदीत कोणीही पोहायला जाऊ नये व पोहताना सापडल्यास कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी यावेळी पोहणाऱ्यांना दिला. ही गोष्ट पोहत असलेल्या तरूणांना समजताच तरूण पटापट नदीपात्रातून बाहेर आले आणि काही वेळात राजाराम बंधारा निरमनुष्य  झाला.  पण या तरूणांनी पोहण्याची हौस भागवण्यासाठी आपला मोर्चा शेतातील विहरीकडे वळवणार असणार ही गोष्ट नाकारता येणार नाही.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन जोरदार प्रयत्न करत आहे. पण नागरिकांनीसुद्धा प्रशासनाला मदत करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे मत नागरितांतून व्यक्त होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT