If you want to travel outside the district, you should get ST 
कोल्हापूर

जिल्ह्या बाहेर प्रवास करायचा आहे, तर अशी मिळावा एसटी

शिवाजी यादव

कोल्हापूर ः एसटी महामंडळातर्फे कोल्हापूर-पुणे व सोलापूर मार्गांसह अन्य मार्गांवर प्रासंगिक कराराने बस गाडी घेऊन प्रवास करता येणार आहे. त्यासाठी किमान 22 प्रवाशांनी एकत्र येऊन प्रवासी समूहातर्फे एसटी बस घेता येणार आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक रोहन पंलगे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 
कोरोना लॉकडाउनमुळे गेले तीन महिने एसटीची सेवा बंद आहे. गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यांतर्गत प्रवासी सेवा सुरू झाली; मात्र प्रवाशांचा प्रतिसाद जेमतेम आहे. तरीही परजिल्ह्यात जाणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी यासाठी एसटी महामंडळाने नवे नियोजन केले आहे. 
कोल्हापुरातून पुणे (हिंजवडी) येथे अनेक प्रवासी प्रवास करतात. याच धर्तीवर कोल्हापूर-सोलापूर नियमित प्रवास करणारे प्रवासी आहेत. असे 22 प्रवासी एकत्र आल्यास त्यांना प्रासंगिक करार तत्वावर बस गाड्या देता येतील याशिवाय अन्य कोणत्याही मार्गावरही एका वेळी 22 प्रवासी मिळाले तर त्यांनाही त्या गावाचा प्रवास करता येणार आहे. 
अशा प्रासंगिक करारानुसार गाडी घेताना परजिल्ह्यात जाण्यासाठी काढावा लागणारा इ पास त्या त्या प्रवाशांनी स्वतः काढायचा आहे, असेही श्री. पलंगे यांनी सांगितले. 

असे होऊ शकते बुकिंग 
प्रासंगिक करारासाठी बस घेण्यासाठी प्रवाशांना आरोग्य तपासणी अहवाल (फिटनेस सर्टिफिकेट), इ पास, आधार कार्ड अशी कागदपत्रे देऊन प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. वरील सर्व संदर्भासह मध्यवर्ती बसस्थानक प्रमुख अथवा आगारप्रमुख यांच्याकडे याबाबतची माहिती अथवा बुकिंगची सुविधा आहे. 

लग्न कार्यासह नियमित प्रवासही शक्‍य 
लॉकडाउनमुळे अनेक लोक परजिल्ह्यांत अडकून पडले आहेत. अनेकांची लग्नं ठरली आहेत. पन्नास व्यक्तींना लग्नास उपस्थितीसाठी परवानगी मिळते; मात्र पर जिल्ह्यात जाता येत नाही, अशा स्थिती आहे. खासगी गाडीचे चालक क्वारंटाईनच्या भीतीने पर जिल्ह्यात गाडी घेऊन येत नाहीत. याशिवाय नोकरी व्यवसायानिमित्ता नियमित प्रवास करणाऱ्यांचाही खोळंबा झाला आहे, अशा सर्व व्यक्तींना एसटीची प्रासंगिक कराराची गाडी घेता येणे शक्‍य होणार आहे. 

प्रति किलोमीटर पन्नास रुपये भाडे 
प्रासंगिक करारावर एसटीची गाडी येता जाता 50 रुपये प्रति एक किलोमीटर याप्रमाणे भाडे आकारणार आहे. याशिवाय हॉल्ट असल्यास त्यांचे स्वतंत्र जादा पैसे मोजावे लागणार आहेत. 
 
सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'उंडवडी सुपे येथील अपघातात दाेनजण जागीच ठार'; कार व दुचाकीचा भीषण अपघात

Sangli : शाळेय विद्यार्थिनीला जबरदस्तीने लैंगिक अत्याचार प्रकरणी नवी अपडेट समोर, पळालेल्या संशयितांना अटक; त्यादृष्टीने सखोल तपास

Latest Marathi News Updates : भारतीय अंतरिक्षवीर शुभांशु शुक्ला १४ जुलैपासून पृथ्वीवर परतीच्या प्रवासाला सुरुवात करतील - नासा

Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; खवय्यांमध्ये संताप, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT