The incessant rain caused the Jackwell of Surupali to collapse 
कोल्हापूर

संततधार पावसाने सुरुपलीचे जॅकवेल कोसळले ; 'हा' होणार परिणाम...

सकाळवृत्तसेवा

मुरगूड - गेले दोन सुरु असलेल्या संततधार पावसाने  सुरुपली ( ता.कागल ) गावाला गेली चाळीस वर्षे पिण्याचे पाणी पुरवठा करणारे वेदगंगा नदीवरील जॅकवेल जमिनदोस्त झाले आहे.यामध्ये पाणी उपसा करणाऱ्या दोन मोटरी,केबल,पाईप असे सुमारे ३० लाखाचे नुकसान झाले आहे.

१९८० साली वेदगंगा नदीवर जमीनीत ७५ फूट तर जमीनीच्या वर ५० फूट उंच मजबूत दगडी बांधकामात हे कोसळेले जॅकवेल बांधण्यात आले होते.पण ते कालबाह्य झाल्याने पाच वर्षापूर्वी पर्यायी जॅकवेल बांधण्यात आले आहे.सध्या या दोन्ही जॅकवेलमधून गावाला पाणी पुरवठा केला जात होता.त्यामुळे कोसळेल्या या जॅकवेलमुळे गावच्या पुरेशा पिण्याच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची आहे.हे जॅकवेल जमिनदोस्त झाल्याने यामध्ये कार्यरत असणाऱ्या साडेसात हॉर्सपॉवरच्या दोन पाणी उपसा करणाऱ्या मोटरी व त्यांच्या केबल, लोखंडी पाईप असे किमती साहित्य गाडले गेले.यात सुरुपली ग्रामपंचायतीचे ३० लाखांचे नुकसान झाले आहे.नव्या व जुन्या अशा दोन्ही जॅकवलेमधून गावाला पिण्याचा पाणी पुरवठा केला जात होता.मात्र जुन्या जॅकवेलमधूनच मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जात होता.

विशेष म्हणजे कोसळेल्या जॅकवेलमध्ये थेट नदीत बांधण्यात आलेल्या जॅकवेलमधून पाणी येत असल्याने उन्हाळ्यात गावाला कोणतेही पाणीटंचाई भासत नव्हती.शिवाय यातून  नैसर्गिकरित्या स्वच्छ झालेले पाणी मिळत होते.आता हेच जॅकवेल कोसळल्याने गावाच्या पिण्याच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.शासनाने हे जॅकवेल दुरुस्त करून द्यावे अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT